उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश
By : Polticalface Team ,01-07-2025
उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश
जेऊर प्रतिनिधी
रेल्वे लाईन खालून उमरड ते केडगाव भुयारी मार्ग झाला पाहिजे म्हणून बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष व आदिनाथ कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम, उमरडचे माजी सरपंच संदीप मारकड पाटील यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील,आमदार नारायण आबा पाटील ,रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र देऊन मागणी केली होती या मागणीची दखल घेऊन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केलाअखेर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले व भुयारी मार्गाचे काम सुरू झाले हा भुयारी मार्ग पूर्ण झाल्यानंतर कुगाव चिकलठाण, दहिगाव, शेटफळ, केडगाव येथील नागरिकांना करमाळा राशिन भिगवन जाण्यासाठी जवळचा मार्ग होणार आहे त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत ऊस वाहतुकीचा मार्गही जवळचा होणार आहे हा भुयारी मार्ग झाला पाहिजे म्हणून आमदार नारायण आबा पाटील यांनी ही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना वेळोवेळी आठवण करून दिली आहे
वाचक क्रमांक :