बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
By : Polticalface Team ,14-09-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १४ सप्टेंबर २०२५ दौंड तालुक्यातील मौजे बोरीबेल 364/01 मधील मोहन गावडे (100/22) KVA डी.पी विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरांनी चोरून नेल्या प्रकरणी दौंड पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्यादी नितीन अशोक क्षिरसागर वय-33 वर्षे धंदा-MSEDCL रा.नानवीज दौड ता.दौड जि.पुणे.यांचे तक्रारी वरून अज्ञात चोरट्यांन विरुद्ध
गु.र.नं 580/2025 भारतीय विद्युत अधिनियम कलम 136 व भा.न्या.सं.क 324(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली
या बाबत अधिक माहिती अशी की दि 09/09/2025 रोजी सकाळी 09.30 वाचे पुर्वी मौजे बोरीबेल गावातील गट नं.364/01 मधील मोहन गावडे (100/22) KVA डी.पी विद्युत रोहित्र त्यामध्ये 80 किलो तांब्याची तार 500 रू जु.वा.कि.अं
अज्ञात चोरट्यांनी 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे
मौजे बोरीबेल गावातील मोहन गावडे (100/22) KVA डी.पी त्यामध्ये 80 किलो वजनाची 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल
कॉपर वायर कोणी तरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली तसेच डि पी मधील ऑईल खाली साडून नुकसान केले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल पोलीस हवालदार शेख, पोलीस हवालदार निकम पुढील तपास करीत आहेत
वाचक क्रमांक :