आरोग्य विभागातील गैरव्यवहार प्रकरणात भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण केल्याबद्दल उपसंचालक, जिल्हाशल्यचिकित्सक यांच्यावर कारवाईची मागणी

By : Polticalface Team ,Mon May 09 2022 19:50:59 GMT+0530 (India Standard Time)

आरोग्य विभागातील गैरव्यवहार प्रकरणात भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण केल्याबद्दल उपसंचालक, जिल्हाशल्यचिकित्सक यांच्यावर कारवाईची मागणी बीड जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कोरोना कालावधीत कोट्यावधी रूपयांचा कागदोपत्रीच खरेदी तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ आधिकारी आधिकारी-कर्मचा-यांनी नातेवाईकांच्या नावे बोगस एजन्सीच दाखवुन सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांनी शासनाची दिशाभूल व आर्थिक फसवणूक केल्याबद्दल विविध सामाजिक संघटना, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते यांनी निवेदने, आंदोलनानंतर सुद्धा उपसंचालक डाॅ.एकनाथ माले व जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे गैरव्यवहार प्रकरणात चौकशी टाळणे तसेच तक्रारदारांना अहवाल देण्यास जाणीवपुर्वक दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण केल्याबद्दल प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.९ मे सोमवार रोजी जिल्हारूग्णालय बीड येथे "अंधेर नगरी चौपट राजा "या म्हणीचा प्रत्यय येत असून डोळ्यावर काळी पट्टी बांधून निषेधार्थ लाक्षणिक धरणे करण्यात येत आहे. आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर,मोहम्मद मोईज्जोदीन, शेख मुबीन,काॅक्रीट. भाऊराव.क.प.नेते काॅ.भाऊराव प्रभाळे, भा.क.प.नेते मोरे रामहरी,वाटमोडे श्रीहरी सहभागी आहेत. जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन देण्यात आले. कोरोना कालावधीत कंत्राटी कर्मचारी भरतीत गंभीर अनितमितता ,दोषीसिद्ध आधिका-यांवर गुन्हे दाखल करा. ____ बीड जिल्हा रूग्णालयात कोविड १९ कालावधीत वाढीव मनुष्यबळापेक्षा आधिकचे मनुष्यबळ जिल्हारूग्णालय डीसीएच बीड ६३ नर्सिंग हाॅस्टेल ५३ डीसीएच आयटीआय ०५ असे एकुण १२१ अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करून गंभीर प्रशासकीय अनियमितता तत्कालीन मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित कुंभार यांनी वेळोवेळी निर्देशित केलेल्या सुचनांचे पालन न करताच भरती करण्यात आली. रूग्णसंख्या कमी झाल्यानंतर मनुष्यबळ कमी करणे आदेशित असताना करण्यात आले नाहीत.दि.४ जुन २०२१ ते ११ जुन २०२१ नुसार बंद करण्यात आलेल्या संस्थामधील कंत्राटी कर्मचारी एकुण २१६ यांना देखील कामावरून कमी केले नाही त्यामुळेच सदरील कंत्राटी कर्मचारी यांचे मानधन देण्यास अडचणी उदभवल्या परीणामी कर्मचाऱ्यांनी जिल्हारूग्णालय परीसरात उपोषण, निदर्शने करत आहेत. संबधित प्रकरणात डाॅ.राठोड, अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक यांनी वाढीव मनुष्यबळापेक्षाही अधिकचे मनुष्यबळ नियुक्त करून गंभीर प्रशासकीय अनियमिता करत ४४,३९९२ /- अतिरिक्त खर्च करून शासनास भुर्दंड सहन करावा लागला असून शिस्तभंगविषयक कारवाईस पात्र असुन डाॅ.सुखदेव राठोड, डाॅ.महेश माने, डाॅ.ढाकणे दोषीसिद्ध असुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे कळवले असुन संबधित प्रकरणात उपसंचालक डाॅ.एकनाथ माले यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण केली असून कंत्राटी भरती मध्ये सुद्धा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आलेला असून पात्र उमेदवार डावलुन भरती करण्यात आलेली आहे. संबधित प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करा. कोरोना कालावधीत खर्चाचे ऑडीट करा ;खरेदी गैरव्यवहार प्रकरणात गुन्हे दाखल करा _____ बीड जिल्ह्य़ातील कोरोनाकाळात आरोग्य विभागाला दिलेल्या कोट्यावधी रूपयांच्या खरेदीमध्ये मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार करण्यात आला असून आरोग्य विभागातील वरिष्ठ आधिकारी तसेच कर्मचारी, नातेवाईक यांच्या नावाने बोगस एजन्सीज दाखवुन आर्थिक गैरव्यवहार करण्यात आलेला असून सीसीटीव्ही,रेमडीसिवीर इंजेक्शन, औषधे खरेदी, जिल्हा हिवताप कार्यालयातुन बोगस प्रमाणपत्र वितरण, प्रेरणा प्रकल्पातील गैरव्यवहार, जीवनामृत रक्तपेढीतील मनमानी कारभार, खरेदी कंत्राटामध्ये गैरव्यवहार प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत . बोगस कामांची देयके,अहवाल देण्यास टाळाटाळ जिल्हाधिकारी, उपआयुक्त यांच्या आदेशाची अवमानना प्रकरणात डाॅ.एकनाथ माले, डाॅ.सुरेश साबळे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करा ______ आरोग्य विभागातील विविध गैरव्यवहार प्रकरणात पुराव्यासह तक्रारीनंतर जिल्हाधिकारी बीड तसेच विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या आदेशानंतर सुद्धा चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यास जाणीवपुर्वक विलंब केला जात असून संबधित प्रकरणातील अहवाल जिल्हाधिका-यांचे लिखित आदेश असताना सुद्धा तक्रारदारांना कळविण्यास टाळाटाळ केली जात देयके देऊ नयेत अशा तक्रारीनंतर सुद्धा बोगस कामांची देयके देण्यात आली असून एकंदरीतच भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण केल्याबद्दल उपसंचालक डाॅ.एकनाथ माले व जिल्हाशल्यचिकित्सक डाॅ.सुरेश साबळे यांची विभागीय चौकशी करून प्रशासकीय कारवाई करण्यात यावी . डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर मो.नं.८१८०९२७५७२
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद