सिरसाळा येथे न्यू अपेक्स हाँस्पीटल व जे.के.मेडिकलचा ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन
By : Polticalface Team ,Mon May 09 2022 19:53:42 GMT+0530 (India Standard Time)
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते सिरसाळा येथे नव्याने सुरू झालेल्या न्यू अपेक्स हाँस्पीटल व जे.के.मेडिकलचा शुभारंभ करण्यात आला. सिरसाळा व तालुक्यातील रूग्णांना हाँस्पीटलच्या माध्यमातून अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्याची सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे रूग्णांना चांगल्याप्रकारे उपचार सिरसाळा येथेच मिळू शकतात असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजयजी मुंडे यांनी उद्घाटन शुभारंभ प्रसंगी बोलतांना केले.
सिरसाळा येथे बी.एस.एन.एल टाँवरच्या बाजूला इदगाह चौकात रविवार दि.08 मे रोजी न्यू अपेक्स हाँस्पीटल व जे.के.मेडिकलचा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते भव्य शुभारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम.टी.नाना देशमुख हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड. गोविंद फड, जि.प.सदस्य प्रा.डॉ. मधुकर आघाव, पंचायत समितीचे सभापती बालाजी ऊर्फ पिंटू मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण पौळ, जि.प.सदस्य बालासाहेब किरवले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली गडदे, पंचायत समितीचे सदस्य माऊली मुंडे, सरपंच सुंदर गित्ते, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राजाभाऊ पौळ, सुंदररराव सहकारी साखर कारखाना तेलगाव संचालक प्रभाकर पौळ, तपोवन मा.सरपंच चंद्रकांत कराड, सिरसाळा सरपंच रामदादा किरवले, उपसरपंच इम्रानखाँ पठाण, माजी सरपंच आक्रमखाँ पठाण, माजी सरपंच वैजनाथराव देशमुख,बीड जिल्हा रूग्णालय भुलतज्ञ एम.बी.बी.एस.डी.ए. डॉ.सय्यद अब्दुल शाफे, सिरसाळा वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमनाथ मुंडे, सिरसाळा हाजी शेख मैनुभाई , सिरसाळा डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉ. भिमराव साळवे, सिरसाळा मेडिकल असोसिएशन अध्यक्ष जनकराव कदम, भगवान पौळ, पैलवान माऊली मुंडे, भगवान कदम, मोहम्मद इनामदार, नगरसेवक आयुबखा पठाण वैद्यकीय, राजकीय, पत्रकार सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.
न्यू अपेक्स हाँस्पीटल व जे.के.मेडिकलची सुविधा आजपासून सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलतांना ना.धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, आता मोठ्या शहरात उपचारासाठी जाण्याची गरज नाही. आता सर्व सोईयुक्त सेवा अशा ठिकाणी मिळणार आहेत. सिरसाळा व परिसरातील गोर गरीब रुग्णांसाठी अल्पदरात आरोग्य सुविधा देण्याच्या उद्देशाने सामाजिक बांधिलकी ठेवत सिरसाळा येथे हॉस्पिटल सुरु केले आहे.तसेच सिरसाळा परिसरातील नागरिकांसाठी उपचारासाठी परळी, अंबाजोगाई, बीड, येथे जाण्याची गरज नसून प्रथमच एमबीबीएस, एमडी डॉक्टर उपलब्ध झाले आहेत. यामुळे रूग्णांना फायदा होणार आहे. या हाँस्पीटल मध्ये उपलब्ध सुविधा 24 तास आवश्यक सेवा, सुसज्ज बाह्यरुग्ण व आंतररूग्ण विभाग, उच्च रक्तदाब, मधुमेह उपचार, दमा उपचार, र्हदय रोग उपचार, गरोदर मतांची तपासणी, प्रसुती विभाग, ई.सी.जी. तपासणी, सेंट्रल आँक्सीजन, डिजिटल एक्स-रे, नेब्युलाइझर, स्पेशल रूम व सर्व सोयीनियुक्त जनरल वार्ड, मेडिकल स्टोअर (24 तास) उपलब्ध सुविधांचा लाभ रूग्णांना मिळणार आहे. अद्ययावत व विविध सोयीयुक्त हाँस्पीटल व मेडिकल नव्यानेच सिरसाळाकरांच्या सेवेत रुजू झाले. वैद्यकीय क्षेत्रात रूग्ण सेवा हिच ईश्वर सेवा असे ब्रीद मानून फुले जोपासना करण्याचे भाग्य मिळणार आहे. सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत पंचायत समितीचे उपसभापती जानिमियाँ कुरेशी, एम.बी.बी.एस.एमडी डॉ. शेख रेहान, सी.सी.वाय.एन.डॉ. सय्यद इरफान, फय्याज जानिमियाँ कुरेशी, जे.के.मेडिकल संचालक सिराज जानिमियाँ कुरेशी (9422240424) यांनी केले आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद महाराज केंद्रे तर आभार पंचायत समितीचे उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद