आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात २८१ विद्यार्थी, संशोधक, शिक्षक व प्राध्यापक सहभागी
By : Polticalface Team ,Mon May 09 2022 19:56:35 GMT+0530 (India Standard Time)
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्यातील दादापाटील राजळे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व कै. रमेश वरपुडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनपेठ,कालिकादेवी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व मिलीया कला विज्ञान व मॅनेजमेंट सायन्स महाविद्यालय प्राणीशास्त्र विभागांच्या तर्फे जलव्यवस्थानाद्वारे ग्रामिण विकास या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदचे शनिवार दि.७ मे २०२२ रोजीआयोजन करण्यात आले होते.उद्घाटक म्हणून दून विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.डाॅ. कुसुम अरुणाचलम,(उत्तराखंड) प्रा. डॉ. दिलीप कुमार झा ( नेपाळ), प्रा. डॉ. विनय कुमार चक्रवर्ती ( बांग्लादेश) यांनी मार्गदर्शन केले.
दादापाटील राजळे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आदिनाथ नगर, कै. रमेश वरपुडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनपेठ, कालिकादेवी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शिरूर कासार व मिलीया कला, विज्ञान व मॅनेजमेंट सायन्स महाविद्यालय, बीड यांच्या प्राणीशास्त्र विभागांच्या तर्फे जल व्यवस्थापनाद्वारे ग्रामीण विकास या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेत उद्घाटन पर भाषणामध्ये त्यांनी जलव्यवस्थापना सोबत , वातावरणातील बदल व त्यांचे होणारे परिणाम, मत्स्यपालना सोबतच एकात्मिक मत्स्य पालन करणे गरजेचे आहे, तरच गावांचा विकास होईल,असे विचार माडंले. सोबत प्राचार्य डॉ राजधर टेमकर यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत केले व अशा प्रकारचे चर्चासत्र भविष्यामध्ये सुद्धा व्हावे जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होईल असे सांगितले.
सर्वप्रथम प्राचार्य डॉ.राजधर टेमकर यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत केले व अशा प्रकारचे चर्चासत्र भविष्यामध्ये सुद्धा व्हावे जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होईल असे सांगितले.
पहिल्या सत्रामध्ये प्रा. डॉ. दिलीप कुमार झा यांनी आपल्या भाषणामध्ये नेपाळमधील जलव्यवस्थापन यावर भाष्य केले. त्यांनी जल व्यवस्थापनासाठी लागणारे शेततळे करून त्यामध्ये मत्स्य पालना सोबतच बाकीच्या प्राण्यांचा सुद्धा संगोपन करावे, असे सांगितले.सोबतच त्यांनी विद्यार्थ्यांनी नवनवीन प्रयत्न करून मस्यपालन या क्षेत्रांत उत्तुंग भरारी घ्यावी, असे म्हटले.पहिल्या सत्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी खेड्यांमध्ये रोजगार निर्मितीसाठी जलव्यवस्थापन कसे महत्त्वाचे आहे, असे आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
दुसऱ्या सत्रामध्ये प्रा. डॉ. विनय कुमार चक्रवर्ती यांनी बांग्लादेशाचे जलयव्यवस्थापन आणि गावांचा विकास यावर भाष्य केले व असे नवनवीन प्रकार भारत व बांगलादेश येथील खेड्यांमध्ये एकत्रितपणे केला तर भविष्यामध्ये जल व्यवस्थापनाचे चांगले परिणाम दिसतील,असे सांगितले. दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विश्वास कंधारे यांनी अध्यक्षीय भाषणात जल व्यवस्थापनाचे महत्त्व व आपण जगाच्या पाठीवर कुठे आहोत, या विषयी माहिती सांगितली.
प्राचार्य डॉ. फजल यांनी सर्व मान्यवर वक्त्यांचे आभार मानले. प्रा. डॉ. तनवीर पठाण यांनी हे चर्चासत्र आयोजित करण्याची कल्पना विशद केली. प्रा. डॉ. सैरी अब्दुल्ला यांनी आभार मानले. प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील यांनी चर्चासत्राच्या उद्घाटकांचा परिचय करून दिला. प्रा. डॉ. संतोष रणखांब यांनी प्रमुख वक्ते यांचा परिचय करून दिला. प्रा. डॉ. अतुल चौरपगार यांनी आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.या चर्चा सत्रात जवळपास २८१ विद्यार्थी, संशोधक शिक्षक व प्राध्यापक सहभागी होते. चर्चासत्र आयोजित करण्यासाठी श्री दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे, आमदार मोनिकाताई राजीव राजळे, सचिव जे.आर.पवार,आदर्श शिक्षण संस्था बीड चे सचिव व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री ना. जयदत्त क्षिरसागर, हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ सोनपेठ चे अध्यक्ष परमेश्वर कदम आणि अंजुम इशात-ई तालिम,बीड या संस्थेच्या सचिव श्रीमती खान साबिया या चार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व सचिव तसेच व्यवस्थापन सदस्य यांनी प्रोत्साहन व मार्गदर्शन केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद