मातंग समाजातील युवकाचा निर्दयपणी झालेल्या हत्येचा निषेध
By : Polticalface Team ,Tue May 10 2022 18:11:43 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी :-
लहुजी शक्ती सेनेच्या वतीने नगर -पुणे महामर्ग शिरूर येथे घोडनदी सतरा कमानी पुला वरती रस्ता रोको आंदोलन करण्यात आले भर उन्हात डांबरी रस्त्यावरती लोटांगण घेत, प्रशासनाच्या नावाने बोंबा मारत भव्य रस्ता रोको आंदोलन लहुजी शक्ती सेना कोर कमिटी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे,विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष अॅड.हेमंत खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, प्रामुख्याने आंदोलनामध्ये शिरुर,श्रीगोंदा तालुक्यातील लहुजी शक्ती सेना मातंग समाज बांधव यांच्यावतीने करण्यात आले. तत्पूर्वी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी तसेच शिरूर श्रीगोंदा येथील तहसीलदार पोलिस प्रशासन यांना रस्ता रोको आंदोलनाचे निवेदन देण्यात आले होते. लहुजी शक्ती संघटनेने आंदोलन दुपारी एक वाजता चालू केले आंदोलन ठिकाणी शिरूर श्रीगोंदा येथील पोलिस प्रशासन घेऊन आंदोलनकांचे निवेदन घेऊन आंदोलन सोडवले.
सविस्तर वृत्त अशे कि 20 एप्रिल रोजी मनेश आव्हाड (वय 27 वर्षे)
मातंग समाजाच्या तरुणावर औरंगाबाद येथे चोरीच्या संशयावरून हल्ला करुन हात-पाय बांधून निर्दयीपणे लाकडी दांडक्याच्या जबर मारहाणीने खून करुन सदरील व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर दहशत निर्माण करण्यासाठी पाठवला होता, तर या घटनेतील सर्व आरोपींना त्वरीत अटक करुन कठोर कायदेशीर कारवाई,तसेच बहुतांश आरोपींना अटक करण्यात आलेली नसून ते फरार आहेत. या प्रकरणाने सर्व समाजाच्या भावना तीव्र असून, यामधील सर्व आरोपींना तात्काळ अटक करुन कठोर कायदेशीर कारवाई,आव्हाड कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी, काही आरोपींना ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या सर्व मागणी करता नगर पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला होता. लवकरात लवकर आरोपींना अटक करून सदरील केस फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावी प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या घरी मातोश्री वरती लहुजी शक्ती सेना व मातंग समाज घेरावा घालणार आहे, असे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले,
यावेळी प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे,विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष अॅड.हेमंत खंदारे,लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे,श्रीगोंदा तालुका अध्यक्ष नवनाथ शिंदे,कार्याध्यक्ष राजाराम काळे,जिल्हा संघटक लखन साळवे, प्रवीण कुमार शेंडगे,प्रकाश साळवे,वसंत औचिते,आप्पा रोकडे,अनिकेत शेंडगे,राजू मोटे,नंदूभाऊ ससाने,विशाल जोगदंड,
नगरसेवक दादाभाऊ लोखंडे,लहुजी शक्ती सेना अध्यक्ष उपाध्यक्ष सचिन दादाभाऊ लोखंडे, प्रफुल्ला आडगळे,नानु भवाळ,पप्पु शेंडगे,सचिन काळोखे,तालुका अध्यक्ष लहुजी शक्ती सेना महिला मोनिकाताई जाधव,शहराध्यक्ष संध्याताई जाधव, पुणे जिल्हा अध्यक्ष फुलाताई थोरात,बबई नाडे, आकाश पवार,पप्पू साळवे,प्रशांत औचिते,आबासाहेब बोरगे,अशोक चव्हाण, संदीप औचिते,सागर गायकवाड,मंगल पठारे, पुष्पा शेंडगे,संतोष गोरखे,तुषार गोरखे,नामदेव सकट,मोहन सकट,अमोल बोरगे,रामराव चव्हाण,योगेश मोटे, भाऊसाहेब औचिते, प्रशांत मोरे,राजु सकट,दादा सकट आदी समाज बांधव उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.