आवाटी येथे येत्या 12 मे रोजी वली बाबा दर्गाह मध्ये उर्स कलंदर कार्यक्रमाचे आयोजन भक्तगणांनी लाभ घेण्याचे वली बाबा दर्गाह ट्रस्टचे आवाहन
By : Polticalface Team ,Tue May 10 2022 19:23:59 GMT+0530 (India Standard Time)
करमाळा (प्रतिनिधी अलिम शेख )
बखशी ए हिंद हजरत शेख शरफुद्दिन बु अली शाह कलंदर नोमानी पानिपती रहमतुल्लाह पानिपत यांच्या स्मरणार्थ आवाटी तालुका करमाळा येथे वली बाबा दर्गाह येथे 723 वा उरूस कलंदर चा धार्मिक कार्यक्रम 12 मे 2022 गुरुवार उर्दू तारीख 10 शव्वाल 14 43 हिजरी जुमेरात रोजी मोठ्या उत्साहात भरणार असल्याची माहिती आवाटी येथील हजरत सय्यद वली चांद पाशा दर्गा ट्रस्ट कमिटीने दिली
गेली दोन ते तीन वर्षापूर्वी कोरोना चा भयंकर असा महा प्रकोप राज्य तसेच भारतात कोरोना च्या माध्यमातून आला होता त्यामुळे दर्गाह परिसरात शासनाच्या आदेशाची काटेकोरपणे नियम पाळत कोणताही धार्मिक कार्यक्रम भरीवला गेला नव्हता मात्र तदनंतर तीन वर्षाच्या कालखंडानंतर सध्या उरूस कलंदर चा कार्यक्रम घेण्यात येत आहे
उरूस कलंदर कार्यक्रमाच्या निमित्ताने दिनांक 12 मे रोजी दर्गाह परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टने दिली सदर धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने दर्गा परिसरात विविध रंगाचे ची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे सदरच्या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ हिंदू तसेच मुस्लिम भक्तगण ही मोठ्या संख्येने घेत असतात सदर धार्मिक कार्यक्रम बरोबर दरगाह मध्ये मोफत अन्नदान अर्थात महालगरखाना याचेही आयोजन करण्यात आले आहे
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी पानिपत येथील शेख शर फुद्दीन बु अली शाह कलंदर पानिपत यांच्या स्मरणार्थ दर्गाह परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सदर धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य तसेच इतर राज्यातून देखील हिंदू-मुस्लीम भक्तगण मोठ्या संख्येने सदरच्या कार्यक्रमाला हजेरी लावून हिंदू-मुस्लीम एकोपा कायम ठेवतात
सदर धार्मिक कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन वली बाबा दर्गा ट्रस्ट कमिटी तसेच आवाटी येथील समस्त ग्रामस्थ यांनी केले आहे
वाचक क्रमांक :