पत्रकार सुनील आढाव यांना अर्वाच्च गलिच्छ भाषेत शिवीगाळ करणाऱ्या एपीआय पालवे यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करा
By : Polticalface Team ,Wed May 11 2022 15:06:35 GMT+0530 (India Standard Time)
बीड ( प्रतिनिधी ) : पाटोदा तालुक्यातील ( जिल्हा बीड ) अमळनेर येथील पत्रकार सुनील आढाव यांना अमळनेर पोलिस ठाण्याचे ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय गोरक्ष पालवे यांनी अर्वाच्च गलिच्छ भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी यांच्यावर दलित अत्याचार प्रतिबंधक ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी लोक पालक पत्रकार संघाचे बीड जिल्हा अध्यक्ष गोरख मोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे .
अमळनेर पोलिस ठाणे हद्दीत चोऱ्यामाऱ्या रोखण्यास अमळनेर पोलिस ठाण्याचे ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्ष पालवी हे अपयशी ठरल्याची बातमी अमळनेर येथील पत्रकार सुनील आढाव यांनी छापली . बातमीचा राग मनात ठेवून अमळनेर पोलिस ठाण्याचे ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय गोरक्ष पालवे यांनी अमळनेर येथील पत्रकार सुनील आढाव यांना अर्वाच्च गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली . सुनील आढाव हे मागासवर्गीय जातीचे असल्याने ते आपले काहीच करू शकत नाहीत , यामुळे एपीआय गोरक्ष पालवे यांनी पत्रकार सुनील आढाव यांना फोनवर अर्वाच्च गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली असून , आशा मगरूर जातीवादी एपीआय गोरक्ष पालवे यांची अमळनेर पोलिस ठाण्यातून बदली / हाकलपट्टी करून मागासवर्गीय पत्रकाराला अर्वाच्च गलिच्छ भाषेत शिवीगाळ करणाऱ्या एपीआय गोरक्ष पालवे यांच्यावर दलित अत्याचार प्रतिबंधक ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा , अशी मागणी लोक पालक पत्रकार संघाचे बीड जिल्हा अध्यक्ष गोरख मोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे .
वाचक क्रमांक :