आवाटी येथे उर्स कलंदर चा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न, राज्य सहित परराज्यातील अनेक भक्तगणांनी लावली मोठ्या संख्येने उपस्थिती
By : Polticalface Team ,Sun May 15 2022 10:03:47 GMT+0530 (India Standard Time)
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील आवाटी येथील हिंदू-मुस्लीम भक्तगणांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हजरत वली चांद पाशा दरगाह मध्ये उर्स कलंदर चा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला अनेक भक्तगणांनी हजारोच्या संख्येने मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखविली
पानिपत येथील हजरत शेख शरफुद्दिन बू अली शाह कलंदर यांच्या स्मरणार्थ आवाटी येथे हजरत वली चांद पाशा दर्गा मध्ये प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या भक्तिमय वातावरणात उर्स कलंदर चा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पानिपत येथील हजरत बू अली शाह कलंदर यांच्या गीलाफ चादरीचे अनेक भक्तगणांनी दिवसभरात मोठ्या संख्येने दर्शन घेतले याशिवाय महफिले समा चा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता
महाराष्ट्र राज्य तसेच इतर राज्यातून देखील मोठ्या संख्येने भक्तगण आले होते आलेल्या भक्तगणा साठी दिवसभर लंगर खाना अर्थात महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता महाप्रसादाचा आस्वाद दिवसभरात अनेक हजारोच्या संख्येने भाविकांनी घेतला
आवाटी येथील हजरत वली चांद पाशा दर्गा मध्ये उर्स कलंदर चा कार्यक्रम एकंदर पाहता शांततेत व मोठ्या उत्साहाने वातावरणात संपन्न झाला यावेळी अनेक भक्तगणांनी वली बाबा यांच्या दर्शना सहित बु अली शहा कलंदर यांच्या गीलाफी चादरीचे दर्शन घेतले
हजरत वली चांद पाशा कादरी ट्रस्ट यांनी यावेळी सर्व भक्तगणासाठी योग्य व पद्धतशीरपणे नियोजन केले होते
वाचक क्रमांक :