९८६ शेतकऱ्यांना मिळाले ७० लाखांचे अनुदान - घनश्याम शेलार

By : Polticalface Team ,Fri May 20 2022 11:45:22 GMT+0530 (India Standard Time)

९८६ शेतकऱ्यांना मिळाले ७० लाखांचे अनुदान - घनश्याम शेलार श्रीगोंदा,दि.१९(प्रतिनिधी) - तालुक्यातील पूरग्रस्त तसेच अतिवृष्टीग्रस्त ९८६ शेतकऱ्यांचे तत्कालीन अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे माघारी गेलेले ७० लाख ४८ हजार ५४४ रुपयांचे अनुदान शासन दरबारी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना मिळवून देण्यात यश आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी दिली. याबाबत बोलताना शेलार म्हणाले की, ऑगस्ट २०१९ मध्ये तालुक्यातील अकरा गावांना पुराचा फटका बसला होता. तर नोव्हेंबर २०१९ मध्ये तालुक्यातील दहा गावांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. या दोन्ही दुर्दैवी घटनांमध्ये एकूण ९८६ शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अनुदान तहसील कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले होते. परंतु, तत्कालीन तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांच्या हलगर्जीपणामुळे हे अनुदान शेतकऱ्यांना वर्ग करता न ते माघारी पाठविण्यात आले होते. सदर अनुदान शेतकऱ्यांना पुन्हा मिळवून देण्याबाबत अजनुजच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्याचबरोबर माझ्याशी चर्चा केली. शेलार पूढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे अनुदान माघारी गेल्याची अक्षम्य चूक आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या लक्षात आणून दिली. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून तत्कालीन तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांची चौकशी केली. चौकशीमध्ये तहसीलदार पवार दोषी आढळल्याने त्यांच्यावर बदलीची कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे माघारी गेलेले अनुदान पुन्हा वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या शेतकरी हिताच्या निर्णयामुळे तालुक्यातील ११ गावांतील ७२३ पूरग्रस्त शेतकऱ्यांना ६१ लाख १७ हजार ६४४ रुपयांचे आणि १० गावांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ९ लाख ३० हजार ९०० रुपयांचे अनुदान असे एकूण तालुक्यातील २१ गावांमधील ९८६ शेतकऱ्यांचे ७० लाख ४८ हजार ५४४ रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना पुन्हा वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी दिली.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.