चला हवा येऊद्या कार्यक्रमात प्रेक्षक घामाघूम: बैठक व्यवस्था कोलमडल्याने व्हीआयपींची घरवापसी , भाऊ कदमच्या हवेचे राजकीय हवेत परिवर्तन.

By : Polticalface Team ,Fri May 20 2022 20:26:50 GMT+0530 (India Standard Time)

चला हवा येऊद्या कार्यक्रमात प्रेक्षक घामाघूम: बैठक व्यवस्था कोलमडल्याने व्हीआयपींची घरवापसी , भाऊ कदमच्या हवेचे राजकीय हवेत परिवर्तन. श्रीगोंदा प्रतिनिधी दि.१९: राजेंद्र नागवडे मित्रमंडळाने नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी आयोजित केलेल्या चला हवा येऊद्या या कार्यक्रमात अपेक्षेपेक्षा प्रचंड रसिक समुदाय आल्याने सुनियोजित कार्यक्रमाला गर्दी, गोंधळ व खुर्च्या फेकाफेकी व हुल्लडबाजीचे गालबोट लागले. श्रीगोंदयाचे सुपुत्र थिंक ब्रॅण्डेड कंपनीचे संचालक अवधूत राऊत यांनी अत्यंत परिश्रमाने तालुक्यात मोठ्या सेलिब्रिटी आणल्या परंतु छत्रपती कॉलेज व ज्ञानदीपच्या सेवक वर्गाने हवेत शिरून बेशिस्त नियोजनामूळे कार्यक्रमाचा फज्जा उडवला. श्रीगोंदा कारखाना निवडणुकीत विजयामुळे राजेंद्र नागवडे यांचे कार्यकर्तेही हवेत गेले होते. लाखो रुपये खर्चून वाढदिवसाचे निमित्त साधत विधानसभेचे सुनियोजित प्रमोशन मात्र काळजीने करण्यात आले. भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर करांडे, भारत गणेशपुरे यांच्या हास्याचे फवारे उडवत बहारदार विनोदी कार्यक्रम व नृत्यांगना श्रुती मराठे हिच्या दिलखेचक अदांमूळे प्रेक्षक घायाळ झाले. कार्यक्रम राजकीय नेत्याचा असल्यामुळे राजकारण ओघाने आलेच निवेदिका यशा हिने माजी आमदार राहुल जगताप यांच्या बैलगाडा शर्यतीची खिल्ली उडवत बैलगाडा शर्यतीच्या प्रेक्षकांना बैल संबोधल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या तर अप्रत्यक्ष बबनराव पाचपुते यांच्या ३५ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीला टोला मारण्यात आला. निवेदकांच्या प्रश्नावलीत नागवडे उभयतांच्या आवेशपूर्ण उत्तराने राजकीय उंचीला खीळ बसली तर कार्यक्रमाला हजर असणारे भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा भाव महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यापेक्षा वधारला. छत्रपती महाविद्यालयाच्या प्रांगणात चला हवा येऊ द्या कार्यक्रमात पत्रकार कक्षात हुल्लडबाज प्रेक्षकांनी ताबा मिळविल्यामूळे पत्रकारांच्या कुटुंबियांना कार्यक्रम सोडावा लागला तर काही प्रेक्षकांच्या बाटल्या व खुर्च्या फेकाफेकीमूळे एक पत्रकार जखमी झाला. तीस वर्षांपूर्वी मढेवडगांव येथे आयोजित केलेल्या दादा कोंडके स्टार नाईट या कार्यक्रमांनंतर सेलिब्रिटी असलेला हा सर्वात मोठा कार्यक्रम काही असंस्कृत प्रेक्षकांमूळे व गलथान नियोजनामूळे काहीसा ढेपाळला परंतु राजेंद्र नागवडे यांच्या भविष्यातील राजकीय कारकिर्दीसाठी मैलाचा दगड ठरला.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.