सामाजिक उपक्रमातून बोरगे यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न.

By : Polticalface Team ,Sun Jun 05 2022 08:50:09 GMT+0530 (India Standard Time)

सामाजिक उपक्रमातून बोरगे यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न. श्रीगोंदा प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील महाराष्ट्र शासन जलसंपदा कुकडी पाटबंधारे उपविभाग क्रं.४ वाडेगव्हाण अंतर्गत कुकडी सिंचन शा.क्रं.१ देवदैठण येथे प्रदीर्घ सेवेतून ३९ वर्षे सेवा करुण सेवानिवृत्ती झाल्याबद्दल किसन गणपत बोरगे यांचा सेवानिवृत्त सोहळा पार पडला. सेवापुर्ती सोहळा निमित्त बोरगे कुटुंबाने समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने ढवळगाव मधे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यासाठी झाडे भेट दिली. यानंतर यावेळी अनेक मान्यवरांनी बोरगे यांचा सन्मान केला व पुढी ल वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व किसन बोरगे यांची प्रदीर्घ सेवेतून निवृत्ती झाली.एक कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून जलसंपदा विभागात त्यांचा नावलौकिक राहिला आहे,किसन बोरगे हे पत्रकार अमोल बोरगे यांचे वडील आहे. यावेळी पारनेर नगर चे आमदार निलेश लंके,राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम अण्णा शेलार,युवानेते अतुलदादा लोखंडे, मा.सभापती शंकर पाडळे,मा.जिल्हा परिषद सदस्य अनिलदादा विर,कुकडी साखर का. मा.संचालक बाळासाहेब पठारे,श्रीगोंदा खादी ग्रामोद्योग मा.चेरमन भगवानराव गोरखे,काँग्रेस विधानसभा वडगावशेरीचे अध्यक्ष रमेश सकट, शिरुरचे नगरसेवक दादाभाऊ लोखंडे,प्रा.केशव कातोरे,शिरुर खादीग्राम उद्योग चे चेअरमन चंद्रकांत सकट,शाखा अधिकारी संजय बोरुडे, कालवा निरीक्षक राहुल निकुंब,प्रकाश कुरंदळे, योगेश कौठाळे,सनी भोस,मा.अभियंता नागवडे रावसाहेब,कालवा निरीक्षक गायकवाड रावसाहेब,मुनिर शेख,कोळपे रावसाहेब,मा.सरपंच विजय शिंदे,सरपंच रवींद्र शिंदे,मा.सरपंच भाऊसाहेब पानमंद,मेजर रामचंद्र लोंढे,शिवाजी लोंढे,कैलास ढवळे,त्रीदल आजी माजी संघटनाचे बापु ढवळे मेजर त्यांचे सहकारी मेजर,सिनेअभिनेते संदिप बोरगे सर,मा.चेरमन गौतम वाळुंज,प्रविण शेंडगे,सुभाष नेटके,सदस्य राहुल बोरगे,महा.रा.मराठी पत्रकार संघ नगर जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पाचपुते,पत्रकार श्रीगोंदा ता.अध्यक्ष अंकुश शिंदे,पत्रकार अंकुश तुपे,योगेश चंदन,प्रमोद आहेर,रामदास कोळपे,बाळु कुल्लाळ सर,कुकडी पाटबंधारे विभागातील कर्मचारी,पत्रकार,ग्रामस्थ, नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता,यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब शिंदे हे होते,तर प्रासताविक मा.प्राचार्य राम शिंदे यांनी केले व सुत्रसंचालन निलेश औचिते यांनी केले. चौकट :- जलसंपदा विभाग पहिल्यापासूनच एक अत्यंत संवेदनशील विषय राहिलेला आहे,त्यामुळे या संबंधित घटक देखील नेहमीच चर्चेत असतात.अनेकदा शेतकऱ्यांचा मोठा रोष पत्करावा लागतो मात्र नियमांच्या चौकटीत राहून शेतकऱ्यांप्रती सहकार्याची भूमिका ठेवावी लागते आणि ते कौशल्य किसन बोरगे काका यांनी लवकरच आत्मसात केले होते आजच त्यांचा निरोप समारंभ त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा :- श्री.निलेश लंके ( आमदार पारनेर-नगर )
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.