भाग्यश्री फंड व धनश्री फंड यांची लखनऊ येथे झालेल्या U 20 वर्ल्ड चॅम्पियनशिप ट्रायल मध्ये उल्लेखनीय कामगिरी
By : Polticalface Team ,Mon Jul 18 2022 11:13:14 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा :-
श्रीगोंदा तालुक्यातील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा कॉलेज व भाग्यश्री स्पोर्ट्स अकॅडमी अंतर्गत इंटरनॅशनल कुस्ती संकुलाच्या लाडक्या खेळाडू पैलवान धनश्री फंड व भाग्यश्री फंड यांचा बोलबाला संपूर्ण देशभर होत आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर अधिराज्य करणारा रांगडा खेळ म्हणजे कुस्ती. हा खेळ सर्व स्तरावर खेळला जातो.
१६.जुलै रोजी लखनऊ येथे पार पडलेल्या U 20 वर्ल्ड चॅम्पियनशिप निवड चाचणी मध्ये भाग्यश्री फंड हिने पुनः एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. तिने या निवड चाचणी मध्ये प्रथम क्रमांक मिळवत आपली खेळातील गुणवत्ता सिद्ध केली.
या निवडीमुळे भाग्यश्रीला भारताचे प्रतिनिधित्व बल्गेरिया येथे होणाऱ्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत करता येणार आहे आणि ही महाराष्ट्राला अभिमानाची गोष्ट आहे.
धनश्री फंड 55 kg व भाग्यश्री फंड 59 kg वजन गटामध्ये या दोन्ही बहिणींनी दोन- दोन कुस्त्या करत अंतिम फेरीत प्रवेश करून या महाराष्ट्राची माती किती कसदार आहे हे सर्वाना दाखवून दिले. पण अंतिम सामन्यात धनश्री फंड ला यशाने हुलकावणी दिली. पण भाग्यश्री ने मात्र आपल्या बहिणीची कसर भरून काढतं अंतिम सामना ही मोठ्या चपळायीने जिंकत कुस्ती मधील आपली हुकूमत पुनः सिद्ध केली.
भाग्यश्रीची बल्गेरिया येथे होणाऱ्या आंतराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीमुळे भाग्यश्री ला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्ण संधी भेटली आहे .
या मिळालेल्या संधीचे भाग्यश्री नक्कीच सोन करेल व भारत देशाला तिच्या माध्यमातून सुवर्ण भेट नक्कीच भेटेल.
भाग्यश्री च्या व धनश्री च्या या यशाबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन आमदार बबनराव पाचपुते साहेब, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माननीय बाबासाहेब भोस साहेब, महाविद्यालय विकास समिती सदस्य मा. आ. राहुल दादा जगताप, मा. महावीर पटवा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के साहेब, सीनियर विभाग उपप्राचार्य प्रा. डॉ. झरे सर, ज्यूनियर कॉलेज उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे, पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झिटे, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जिमखान्या मधील क्रीडा शिक्षक प्रा. संजय डफळ, शारीरिक संचालिका प्रा. बहिरम मॅडम, कोच नवीन पुनिया सर, समाधान सर व प्रकाश कोळेकर सर, मेजर हनुमंत फंड (वडील) यांनी मार्गदर्शन केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.