ग्रामीण भागातील सिद्धांतची शिक्षणासाठी अमेरिकेला भरारी
By : Polticalface Team ,Mon Jul 18 2022 15:35:27 GMT+0530 (India Standard Time)
प्रतिनिधी (गजानन कोकितकर) बसर्गे तालुका चंदगड या ग्रामीण भागातील युवक कुमार सिद्धांत संजय पाटील यांनी संपूर्ण तालुक्याला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे, त्याची अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटी ब्ल्यूमीगटन येथे एम एस साठी निवड झाली आहे , एका ग्रामीण भागातील युवकाने अमेरिकेसारख्या देशात शिक्षणासाठी भरारी घेतल्या मुळे तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे, सिद्धांत पुढील उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला 26 जुलै रोजी प्रस्थान करत आहे.
बसर्गे तालुका चंदगड येथील कुमार सिद्धांत संजय पाटील यांची अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटी ब्ल्यू मी गटन येथे उच्च शिक्षणms/it साठी निवड झाली आहे. तर सिद्धांत आता 26 जुलैला अमेरिकेला प्रयाण होतोय. त्यामुळे गावातील सर्व नागरिकांच्या कडून सिद्धांत वर व त्याच्या कुटुंबियांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.
यूएस विद्यापीठांमध्ये MS अभ्यास कार्यक्रमाचा कालावधी सामान्यतः 1.5 - 2 वर्षांच्या दरम्यान असतो. तथापि, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी यांसारख्या विषयांतील काही पदव्युत्तर कार्यक्रम पूर्ण होण्यासाठी 3 - 5 वर्षे लागू शकतात.
वाचक क्रमांक :