पाच वर्षीय मुलीला चॉकलेट चे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी... श्रीगोंदा दलित महासंघाची मागणी

By : Polticalface Team ,Thu Jul 21 2022 13:56:44 GMT+0530 (India Standard Time)

पाच वर्षीय मुलीला चॉकलेट चे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या आरोपीला  कठोर शिक्षा व्हावी... श्रीगोंदा दलित महासंघाची मागणी श्रीगोंदा: धानोरी उस्मानाबाद येथील अंगणवाडीत शिकणाऱ्या पाच वर्षीय मुलीला चॉकलेट चे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या आरोपीला तात्काळ कठोर शिक्षा व्हावी आणि पीडितांना न्याय मिळावा यासाठी श्रीगोंदा दलित महासंघाच्या वतीने तहसीलदार श्रीगोंदा यांना निवेदन देण्यात आले. उस्मानाबाद जिल्यातील लोहारा तालुक्यातील धानोरी गावामध्ये पाच वर्षीय मुलगी अंगणवाडीत शिक्षण घेत होती .दि.18 जुलै रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आरोपीने अंगणवाडीत जाऊन सदर अल्पवयीन मुलीला चॉकलेट देतो म्हणून घेऊन गेला. मुलीला चॉकलेट देऊन त्याने एका निर्जन स्थळी बंद असलेल्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यांनतर त्याने या मुलीला घरी आणून सोडले .घरी आल्यावर मुलीने सगळा प्रकार आईला सांगितला. हा सगळा प्रकार ऐकल्यावर पीडित मुलीची आई, वडील ,आजोबा यांनी लोहारा पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल करून आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती .सदर घटनेचे गांभीर्य पाहून लोहारा पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. घटनेचा तपास डीवायएसपी रमेश बरकटे हे करत आहे. या घटनेने राज्यात खळबळ उडल्यानंतर विविध दलित संघटना त्यामध्ये बहुजन रयत परिषद, लहुजी शक्ती सेना, आधुनिक लहुजी शक्ती संघटना, श्रीगोंदा तालुका सकल मातंग कोर संघटन या संघटनांनी निषेध केलेला आहे.श्रीगोंदा येथील दलित महासंघाच्या वतीने नायब तहसीलदार ढोले मॅडम यांना निवेदन दिले आहे.सदरचा खटला हा जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला लवकर कठोर शिक्षा व्हावी. त्याचबरोबर पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे आणि त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे. यावेळी दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत सकट,खादी ग्रामोद्योग माजी चेअरमन भगवान गोरखे, श्रीगोंदा तालुका सकल मातंग कोर कमिटीचे अध्यक्ष नंदुभाऊ ससाणे, बहुजन रयत परिषद अहमदनगर जिल्हा अध्यक्ष बापू गायकवाड, आधुनिक लहुजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलचे तालुका अध्यक्ष संदीप उमाप, श्रीगोंदा तालुका सकल मातंग समाज कोर कमिटीचे सचिव मनोज घाडगे, संतोष गोरखे, लहुजी शक्ती सेनेचे शहाराध्यक्ष प्रफुल्ल अढागळे,दादासाहेब ठवाळ, रमेश रजपूत,संदीप ससाणे आदी उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.