By : Polticalface Team ,Tue Aug 09 2022 16:11:22 GMT+0530 (India Standard Time)
नांदेड : जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा केला होता. मात्र या दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे शेत पाहण्याचे राहून गेल्याने मुख्यमंत्र्यांनी नांदुसा गावाचे सरपंच भास्कर जानकवडे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला.
यावेळी गावातील इतर शेतकरी देखील उपस्थित होते. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी नुकसानीची चौकशी केली तर मदतीचे आश्वासन दिले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे.
तुमचं शेत पाहणं राहून गेलं, पण तुम्ही कोणतीही काळजी करु नका, पंचनामे झाले का? आम्ही लवकरच मदत जाहीर करणार आहोत, अपेक्षेपेक्षा जास्त मदतीची घोषणा हे सरकार करेल, असं म्हणत शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देखील दिला.
वाचक क्रमांक :