नानासाहेब गायकवाड यांना गुरुवर्य बा. ग. जगताप यांच्या जयंतीनिमित्त जनता शिक्षण संस्थेकडून आदर्श शिक्षकेतर पुरस्कार
By : Polticalface Team ,Thu Aug 18 2022 15:04:13 GMT+0530 (India Standard Time)
अमोल गायकवाड -वडगाव निंबाळकर
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील जनता शिक्षण संस्थेचे स्वातंत्र्य विद्या मंदिर या प्रशालेचे कर्तव्यदक्ष कर्मचारी नानासाहेब गायकवाड यांना गुरुवर्य बा ग जगताप यांच्या जयंतीनिमित्त जनता शिक्षण संस्थेकडून आदर्श शिक्षकेतर पुरस्कार मिळाल्याबद्दल बारामती तालुका बहुजन हक्क परिषद यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
गुरुवर्य बा ग जगताप यांच्या जयंतीनिमित्त चाकण या ठिकाणी जनता शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार नानासाहेब गायकवाड यांना देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्राचार्य डी ए बनकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नानासाहेब गायकवाड यांची प्रशालेमध्ये काम करण्याच्या पद्धतीचा गुणगौरव केला. व संस्थेने त्यांना पुरस्कार दिल्याबद्दल प्रशालीच्यावतीने त्यांचा सत्कार केला. पत्रकार अमोल गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नानासाहेब गायकवाड हे शांत व संयमी विचाराचे आहेत. ते आपल्या कर्तव्याशी व आपल्या कामाशी खूप प्रामाणिक आहेत. त्यामुळे संस्थेने त्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार दिल्याबद्दल वडगाव निंबाळकरचे ग्रामस्थ व बहुजन हक्क परिषद बारामती तालुका यांच्यावतीने त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वातंत्र्य विद्या मंदिरचे प्राचार्य डी ए बनकर शिक्षक डी बी चौगुले व बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने श्रीनाथ पतसंस्थेचे चेअरमन सचिन साठे युवा कार्यकर्ते अक्षय जाधव, रविराज साळवे, पप्पू पवार ,गणेश माने व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :