श्रीगोंदा तालुक्यात भाऊ बहिनीच्या नात्याला काळीमा.!! बहिणीला विष पाजण्याचा प्रयत्न करत स्वतःही प्राशन केले विष...!

By : Polticalface Team ,

श्रीगोंदा तालुक्यात भाऊ बहिनीच्या नात्याला काळीमा.!!  बहिणीला विष पाजण्याचा प्रयत्न करत स्वतःही  प्राशन केले
 विष...! दिनांक 28 ऑगस्ट 2022,श्रीगोंदा: तालुक्याच्या पश्चिमभागात राहणाऱ्या त्या गावातील बहिणीला माझ्यावर प्रेम कर नाहीतर तुझ्या कॉलेजमध्ये येऊन मी पण विष घेईन आणि तुला पण पाजेल..! अशी धमकी देत नमूद कॉलेजात जाऊन मुलीला विष पाजण्याचा प्रयत्न करत स्वतःही विष प्राशन केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्या मुलावरती ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा या ठिकाणी उपचार चालू आहेत.

तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या मुलीला तिच्या मावस भावाने श्रीगोंद्यातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असून, कॉलेजच्या होस्टेलवर सुमारे एक महिन्यापासून रहावयास आहे.

त्या पीडित मुलीचा चुलत मावसभाऊ मनोज बाळू बडदे रा कुडोली, रहेमतपुर रोड सातारा शहर जि.सातारा येथे राहतो. त्याची व पीडित मुलीची सुमारे एक वर्षा पुर्वी ओळख झाली आहे. ओळख झाल्यानंतर मनोज याने फोन करून तु मला आवडतेस माझे तुझ्यावर प्रेम आहे..! असे तिला म्हणाला. त्यावेळी पीडितेने त्यास आपले बहिण भावाचे नाते आहे. तु असा विचार करू नको.. असे म्हणाली. तसेच, त्याबाबत आई वडीलांना सांगीतल्यानंतर मुलीच्या आईने त्यास भेटून समजावून सांगीतले होते.

त्यानंतर त्याने पिडीतेला फोन करणे बंद केले होते. परंतु, सुमारे दोन आठवड्यापासून मनोज हा पुन्हा मुलीच्या मोबाईल वर फोन करत होता. परंतु पीडित मुलगी त्याचा फोन उचलत नव्हती.

दिनांक 27 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 10:00 वा.चे सुमारास मुलगी हॉस्टेलमध्ये असतांना तिचा चुलत मावस भाऊ मनोज याने त्याचे फोन वरुन फोन करुन तिला, तु माझा फोन का उचलत नाही?.. माझे मेसेजला उत्तर का देत नाही?... तेव्हा तिने त्यास तु माझा नात्याने भाऊ आहेस. मला वारंवार फोन, मॅसेज करुन त्रास देऊ नको. असे म्हणाल्याचे त्याने तिला शिवीगाळ करुन, माझ्याशी बोलली नाही तर.. मी उद्या तुझ्या कॉलेज मध्ये येवुन औषध पिनार आहे अशी धमकी दिली.

त्यानुसार दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7:00 चे सुमारास पीडित व तिच्या मैत्रिणी कॉलेजच्या होस्टेल पासुन कॉलेज कडे पायी चालत जात असतांना चुलत मावस भाऊ मनोज याने अचानक समोरुन येवुन पीडितेला अडवले व मला तु माझे सोबत का बोलत नाहीस.. माझा फोन का उचलत नाही म्हणत मुलीच्या हाताला धरुन बाजुला ओढले व हात पकडून माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

त्यावेळी पीडित मुलगी त्याला समजावित असताना त्याने मुलीच्या हातातील मोबाईल घेवुन आपटुन फोडला. तसेच, त्याने त्याचे खिशातुन विषारी औषधाची बाटली काढुन तु माझ्याशी बोलली नाही, तर मी औषध पिईन असे म्हणुन बाटलीतील औषध पिला. व त्याच्या काळ्या रंगाचे मोटरसायकलवर निघून गेला.

मनोज हा त्याचे मोटरसायकलवर जात असताना खाली पडल्याने त्यास कोणीतरी औषधोपचारकामी दवाखान्यात घेवून गेले आहेत. त्यानंतर मी सदर घडलेला प्रकार मुलीच्या मैत्रिणीचे फोन वरुन आई - वडीलांना सांगीतला तसेच कॉलेजचे प्राचार्य, सर व इतर शिक्षकांना सांगीतला. त्या मुलीने आई वडीलांसह येऊन पोलीस ठाण्यात भादंवि 354 व पॉक्सो नुसार गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर हे करत आहेत. तसेच विषारी औषध घेतलेल्या मनोजवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
स्त्रोत:(फिर्याद)

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.