रासायनिक खताच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनी नापीक होत आहे तेव्हा सेंद्रिय शेती काळाची गरज बनली आहे : गटविकास अधिकारी मनोज राऊत
By : Polticalface Team ,Tue Aug 30 2022 21:48:30 GMT+0530 (India Standard Time)
करमाळा प्रतिनिधी
रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे जमीनी नापिक होत असुन सेंद्रिय शेती काळाची गरज बनली आहे महाराष्ट्रात पंजाब सारखी स्थिती होऊ नये यासाठी आतातरी सावध झाले पाहिजे असे मत गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी यांनी शेटफळ ता करमाळा येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंचायत समिती करमाळा व ग्रामपंचायत शेटफळ यांच्या वतीने आयोजित सेंद्रिय शेती विषयक कार्यशाळेत बोलताना केले.
पुढे बोलताना या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे होते यावेळी सेंद्रिय शेती क्षेत्राती कृषी भूषण नामदेव साबळे म्हणाले की योग्य पद्धतीने सेंद्रिय शेती केल्यास शेती तोट्यात जात नाही यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे शेतीसाठी लागणारेखत शेतकऱ्यांनी स्वतः तयार केले पाहिजे यावेळी त्यांनी सेंद्रिय गूळ व शेळीपालन याविषयी माहिती सांगितली.
सेंद्रिय शेती तज्ञ कृषीभुषण शिवराम घोडके यांनी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर टाळून जनावरांचे मलमुत्र व शेतीमधील टाकावू पदार्थ यापासून स्वतःचे खतनिर्मितीचे कारखाने तयार करावेत कायम दुर्लक्षीत आसणारे उकिरडे ही शेतकऱ्यांची मोठी संपत्ती आसुन यांची जाणीव शेतकऱ्यांना नाही याची खंत वाटते .उकिरड्यावर शास्त्रशुद्धपणे कुजण्याची प्रक्रिया केल्यास एक शेतकरी सात ते आठ टन खत तयार करू शकतो. याचा वापर आपल्या शेतात केल्यास रासायनिक खतांची गरजच भासणार नाही. तर हानुमंत यादव यांनी दवाखान्याकडे जाणारा पैसा वाचवायचा असेल तर विषमुक्त शेती केली पाहिजे असे मत व्यक्त केले. गटविकास अधिकारी मनोज राऊत आपल्या भाषणात म्हणाले की रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापराउ महाराष्ट्रात पंजाबसारखी स्थिती निर्माण होऊ द्यायची नसेल तर वेळीच सावध होऊन सेंद्रिय शेती केली पाहिजे तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी सेंद्रिय शेतीची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी किमान आपल्या कुटुंबाला लागणारा भाजीपाला व अन्नधान्य सेंद्रिय पद्धतीने पिकवला पाहिजे.
सुरवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक सचिन सरडे यांनी केले उपस्थितांचे स्वागत बाजार समीतीचे संचालक दादासाहेब लबडे सरपंच विकास गुंड, उपसरपंच आनंद नाईकनवरे , ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग लबडे बाबूराव चोरगे.महादेव गुंड , काकासाहेब गुंड यांनी केले सूत्रसंचालन लटके भाऊसाहेब यांनी केले तर आभार गजेंद्र पोळ यांनी मानले.या कार्यक्रमाला चिखलठाणचे सरपंच चंद्रकांत सरडे, बाजार समीतीचे संचालक दादासाहेब लबडे, सरपंच विकास गुंड, सहाय्यक गटविकास अधिकारी राजाराम भोंग कृषी अधिकारी मिरगणे साहेब विस्तार अधिकारी मनोज महत्रे अविनाश थोरात ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष सुशेन ननवरे सचिव दादासाहेब केवारे भाऊसाहेब संजय राऊत, रणजित लबडे, विठ्ठल गुंड, रणजित शिंदे यांच्यासह परिसरातील शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.