विदर्भ कोकण ग्रामीण बँक, करमाळा शाखेने केले पाच महिन्यात ८ कोटी ५४ लाख रुपयाचे कर्ज वाटप, शेतकऱ्यांना दिलासा

By : Polticalface Team ,Tue Aug 30 2022 21:56:34 GMT+0530 (India Standard Time)

विदर्भ कोकण ग्रामीण बँक, करमाळा शाखेने केले पाच महिन्यात ८ कोटी ५४ लाख रुपयाचे कर्ज वाटप, शेतकऱ्यांना दिलासा करमाळा प्रतिनिधि : एकीकडे राष्ट्रीयीकृत बँकाकडून पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची फरफट होत आहे. तर दुसरीकडे करमाळा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने अवघ्या पाच महिन्यात शेतकऱ्यांना ६ कोटी ५४ लाख पिक कर्जाचे वाटप करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. वेळेवर पिक कर्ज मिळाल्यामुळे शेतकरी सुद्धा समाधान व्यक्त करीत आहेत.

तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या करमाळा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने १ एप्रिल २०२२ ते २९ ऑगस्ट २०२२ या पाच महिन्यात ६ दत्तक गावातील शेतकऱ्यांना बँक व्यवस्थापक शरद सु. सावंत व सहायक व्यवस्थापक शिवम ग. बारहाते यांच्या आदेशानुसार बँक मित्र व बँक सखी यांच्या माध्यमातून पिक कर्ज धारकांना ६ कोटी ५४ लाख रुपयाचे वाटप करून एक आदर्श निर्माण केला आहे. पिक कर्ज वाटपात तालुक्यात बहुदा ही शाखा प्रथम क्रमांकावर असावी.

शासनाने पिक कर्ज वाटप करण्यासाठी राज्यातील बँकांना निर्देश दिले होते. मात्र काही बँकेत शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे भिक नको पण कुत्रा आवर अशी म्हणण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली होती. परंतु विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या करमाळा शाखेने आपल्या दत्तक ६ गावातील पिक कर्जासाठी पात्र लाभार्थ्यांना ६ कोटी ५४ लाख रुपयांचे वाटप अवघ्या पाच महिन्यात केले आहे.

तसेच १५ बचत गटांना ३३ लाख रु.,दुचाकी व चारचाकी वाहन कर्ज ३६ लाख रु. , शैक्षणिक कर्ज,सोने तारण कर्ज,मुद्रा कर्ज असे २ कोटी रुपयाचे कर्ज वाटप केले आहे. शाखेने अवघ्या पाच महिन्यात एकुण ८ कोटी ५४ लाख रुपयाचे कर्ज वाटप करून विदर्भ कोकण ग्रामीण बँक, करमाळा शाखेने एक विक्रम केला आहे.

या शाखेला तालुक्यातील ६ गावे जोडण्यात आली आहेत. जास्तीत जास्त खातेदारांना दिलासा मिळावा, त्या अनुषंगाने शाखा व्यवस्थापक शरद सु.सावंत, सहायक व्यवस्थापक शिवम ग. बारहाते, कॅशियर रेखा स.थोरे, बँक मित्र व बँक सखी हे पूर्णपणे कर्तव्यदक्षपणे काम करत आहेत.

शाखा व्यवस्थापक खातेदारांना वाहन कर्ज, सोने तारण कर्ज, गृह कर्ज, मालवाहतूक वाहन कर्ज, व्यवसाय वृध्दी साठी कर्ज अश्या अनेक इत्यादी कर्जांचा तसेच मुदत ठेवीवर १ वर्ष ते २ वर्ष - ५.७५% , २ वर्ष ते १० वर्ष - ६.२५% व जेष्ठ नागरिक ०.५०% जास्त व्याज असल्याने या संधीचा लाभ घेण्याचे खातेदारांना आवाहन करत आहेत. विदर्भ कोकण ग्रामीण बँक,करमाळा शाखा खातेदाराच्या हिताची असल्याची प्रतिक्रिया अनेक शेतकरी तसेच बँक खातेदार देत आहेत.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद