बेलवंडी गावच्या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या प्रश्नांवर सरपंच ग्रामसेवक निरुत्तर...
भ्रष्टाचाराच्या मुद्यांनी ग्रामसेवक व सरपंच धारेवर...
By : Polticalface Team ,Wed Aug 31 2022 16:36:30 GMT+0530 (India Standard Time)
तालुक्यातील आयएसओ नामांकन प्राप्त ग्रामपंचायत बेलवंडी बुद्रुक ग्रामपंचायत ची सर्वसाधारण ग्रामसभा सरपंच सुप्रियाताई संग्राम पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.वैयक्तिक लाभार्थी निवड तंटामुक्त अध्यक्ष निवड पंधरावा वित्त आयोग आराखडा दलित वस्ती विकास कामे ग्रामनिधी खर्च निकृष्ट डांबरीकरण च्या झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्याने चांगलीच गाजल्याने सरपंच व ग्रामसेवक यांना जनतेच्या प्रश्नावर हाताची घडी तोंडावर बोट ठेवण्याची वेळ आली.ग्रामसभा संपेपर्यंत गोंधळ राहिल्याने सरपंच सुप्रिया पवार यांना अध्यक्षीय मनोगत व्यक्त न करताच ग्रामसभा आटोपती घ्यावी लागली
बेलवंडी ग्रामपंचायत ची सर्वसाधारण ग्रामसभेसाठी ग्रामपंचायत परिसरात सकाळी दहा वाजता नागरिक उपस्थित झाले होते परंतु ग्रामसेवक यांनी ग्रामसभा ऑफिसमध्येच घेणार असल्याचे सांगितल्याने नागरिक संतप्त झाले त्यांनी ग्रामसभा मोकळ्या पटांगणात घेण्याची विनंती केली आणि माइक आणि स्पीकर नसल्यामुळे ग्रामसभा 11.30 ला सुरू झाली. सुरुवातीलाच ग्रामसेवक अर्जुन साबळे यांनी सभेतील अजेंडा व त्यावर येणारे विषय वाचून दाखवले. तलाठी निंबाळकर यांनी महसूल च्या योजनांची माहिती दिली. ग्रामसभेला पोलीस पाटील,सेंट्रल बँक ,आरोग्य विभाग, महावितरण, शिक्षण, महिला व विभागाचे प्रतिनिधी गैरहजर होते.
आदिवासी समाजातील नागरिकांनी पारधी समाजासाठी सांस्कृतिक भवनासाठी जागेची मागणी केली.नाभिक समाजानेसंतसेना महाराज मंदिरासाठी जागेची मागणी केली तसेच चर्मकार समाजाने देखील चर्मकार विकास केंद्र सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत कडे जागेची मागणी केली होती. त्यावर ग्रामसभेत एकमत होऊ शकले नाही.
युवराज शेलार सर यांनी वृक्षसंवर्धन यावर झालेला बोगस खर्च आणि मुरुमीकरणा ची बोगस बिले यावरून ग्रामसेवकास चांगलेच धारेवर धरले. सर्जेराव साळवे यांनी गावातील अर्धवट काँक्रीटीकरण च्या रस्ता, बेलवंडी शिव मोजणी, वैयक्तिक लाभार्थी निवड करताना झालेला भेदभाव, नळ कनेक्शन आणि ग्रामपंचायत कडे जुने झेरॉक्स मशीन असताना 127000 रुपयाचे नवीन झेरॉक्स मशीन का खरेदी केले यावर प्रश्न विचारले असता ग्रामसेवक निरुत्तर झाले.
खरेदी विक्री संघाचे संचालक सुभाष काळाणे यांनी तंटामुक्ती समिती फेरनिवड घेण्याचा ठराव मांडला असता ग्रामसेवक यांनी तंटामुक्ती अध्यक्ष 15 ऑगस्ट नंतरच्या पहिल्या सभेत बदलता येतो असा जीआर असताना ग्रामसेवकांनी चालू सभा ही 15 ऑगस्ट ची आहे. 15 ऑगस्ट नंतर ची नाही असे सांगून लोकांची दिशाभूल केली व पुढील मिटिंगच्या अजेंड्यावर हा विषय घेऊ असे सांगितले. संदीप धुमाळ यांनी गावात काटेरी झुडपे,पावसात केलेले निकृष्ट डांबरीकरण,स्टँड वरील सार्वजनिक मुतारी ग्रामपंचायत ने पाडली असल्याने ग्रामसेवक व सरपंच यांना धारेवर धरले.
यावेळी, गणेश शेलार, सुनील ढवळे, आप्पासाहेब अरकस,नामदेव साळवे,तात्याबा हिरवे,जयदीप मगर, विलासराव राजेभोसले, दिलीप रासकर, मुरलीधर ढवळे यांनी आपल्या मनोगतातून ग्रामपंचायत च्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
याप्रसंगी श्रीगोंदा कारखाण्याचे माजी व्हा. चेअरमन ज्ञानदेव हिरवे, उपसरपंच उत्तम डाके, गंगाराम हिरवे, सोपान हिरवे, युवराज पवार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संग्राम पवार,ऋषिकेश शेलार यांनी, सुनिल धनवडे, कैलास राऊत,नानाभाऊ हिरवे, संभाजी आरकस, शिवाजी शेलार ,अशोक शिंदे,दीपक धनवडे, राजेश लांडे, तान्हाजी शेलार, संदीप आरकस, निखिल क्षीरसागर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खरतर बेलवंडी गावच्या सरपंच उच्चशिक्षीत पीएचडी डॉक्टर असल्याने गावाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या परंतु जनतेचा अपेक्षाभंग झाला असे आजच्या ग्रामसभेवरून दिसून आले. पारदर्शक कारभार करताना वैयक्तिक लाभार्थी निवड , जमा खर्च, ग्रामपंचायत ऑडिट,वित्त आयोग आराखडा पारदर्शक पद्धतीने हे ग्रामसभेत चर्चा करून ग्रामस्थांना विचारून करतील अशी आशा होती व एक चांगला पायंडा पाडतील अशी अपेक्षा होती परंतु अपेक्षा भंग झाला मागील प्रमाणेच कारभार केल्याने लवकरच ग्रामपंचायत ने केलेल्या भ्रष्टाचाराची आणि बोगस बिले काढलेल्या कामाची जिल्हा परिषदेच्या सीईओ कडे तक्रार करून चौकशी लावणार आहे.
- सुनिल ढवळे चेअरमन समता पतसंस्था बेलवंडी
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.