By : Polticalface Team ,Fri Sep 02 2022 16:50:03 GMT+0530 (India Standard Time)
पर्यावरणाविषयकची संकल्पना वृक्षमित्र तथा मुख्याध्यापक बाळासाहेब जठार यांच्या संकल्पनेतून राबवली जात आहे. त्यांनी यापूर्वी अनेक विद्यालयांमध्ये "झाडे लावा झाडे वाढवा" ही जनजागृती मोहीम राबवून विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यात पुढाकार घेतला होता. आज शुक्रवारी पिंपरी कोलंदर येथील वन्य परिसरात पर्यावरण संरक्षण व जनजागृती मोहीम राबवत विद्यार्थ्यांनी वनभोजनाचा आनंद घेतला.
सदर जनजागृती प्रसंगी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून माजी उपसरपंच बजरंग ओहोळ आणि मेजर कानिफनाथ कापरे यांनी विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक वृक्षमित्र बाळासाहेब जठार, उपशिक्षक समीर अकोलकर, श्री रमेश कळमकरसर श्रीमती नीलम ढवळे, श्रीमती अर्चना पवार, श्री योगीराज नाईकवाडी इत्यादी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले. वाचक क्रमांक :