श्री छत्रपती शिवाजी कॉलेजमधील मुलींची बहुराष्ट्रीय औषध कंपनीत गरूडझेप

By : Polticalface Team ,Sat Sep 03 2022 23:15:59 GMT+0530 (India Standard Time)

श्री छत्रपती शिवाजी कॉलेजमधील मुलींची बहुराष्ट्रीय औषध कंपनीत गरूडझेप लिंपणगाव (प्रतिनिधी) -श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या, श्री छत्रपती शिवाजी कॉलेजमधील एम.एस्सी (रसायनशास्त्र) भाग-२ या वर्गातील योगिता गिरमकर आणि दुसरी माजी विद्यार्थिनी ऐश्वर्या शेंडगे या २ विद्यार्थिनींची हैद्राबाद येथील नामांकित बहुराष्ट्रीय औषध कंपनीत नोकरीसाठी नुकतीच निवड झाल्याची माहिती, कॉलेजचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी दिली.

वडील जिजाबापू गिरमकर(रा-अजनुज) हे व्यवसायाने शेतकरी. परंतु त्यांनी मुलीला उच्चशिक्षित करून करीअर करता सतत प्रोत्साहन आणि पूर्ण स्वातंत्र्य दिले. मुलगी योगिता गिरमकर ही भावंडांमध्ये वयाने सर्वात मोठी आणि अभ्यासात हुशार तसेच माजी विद्यार्थिनी ऐश्वर्या शेंडगे (रा-श्रीगोंदा) ही सुद्धा शेतकरी कुटुंबातीलच. कष्ट,जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या दोघींनी हे यश संपादन केले. प्लेसमेंट सेल मार्फत छत्रपती शिवाजी कॉलेज,श्रीगोंदा आणि हैद्राबाद येथील अरॅजेन लाईफ सायन्स लि यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन कॅम्पस इंटरव्ह्यू चे आयोजन करण्यात आले. भारतातील या नामांकीत औषधनिर्मिती करणाऱ्या कंपनीत, रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागातील जागांकरिता पहिल्या टप्प्यात सोमवार दिनांक ८ ऑगस्ट २०२२ रोजी ऑनलाईन टेस्ट घेण्यात आली, १२ विद्यार्थ्यांपैकी छत्रपती कॉलेजचे ११ विद्यार्थी टेस्ट पास झाले. दुसऱ्या टप्प्यात बुधवार दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी ११ पैकी ३ विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये वरील २ विद्यार्थिनींची दि. २८ ऑगस्ट २०२२ रोजी चांगल्या पॅकेजवरती नोकरीसाठी निवड झाल्याची अधिकृत माहिती कंपनीने ईमेल द्वारे दिली.अजून काही विद्यार्थ्यांच्या मुलाखती बाकी आहेत.त्या लवकरच होणार असल्याची माहिती कंपनीच्या डेप्युटी मॅनेजर श्रीदेवी मॅडम यांनी सांगितले. पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध कॉलेजच्या एकूण १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. या मुलाखतीच्या यशस्वीतेसाठी प्लेसमेंट सेल विभागातील प्रा.विलास सुद्रिक यांनी विशेष मेहनत घेतली तसेच इतर सदस्य प्रा.विजय इथापे आणि प्रा. प्रविण नागवडे यांनी त्यांना खंबीर साथ दिली.

फक्त डिग्री देण्यापुरती ही संस्था नसून विद्यार्थ्यांच्या हाताला काम मिळवून देणारी ही अमृतवाहिनी झाली पाहिजे, या स्व.बापूंच्या विचाराने प्रेरित होऊन आदरणीय राजेंद्र दादा नागवडे आणि विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम सुरू आहेत. कॉलेजचा प्लेसमेंट विभाग २५ पेक्षा जास्त कंपनी अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. छत्रपती कॉलेजचे विविध कंपन्यांसोबत जवळपास १० सामंजस्य करार झाले आहेत. म्हणूनच २०२१-२२ या एकाच शैक्षणिक वर्षात कॅम्पस मुलाखतीमधून ६० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत, पुढेही हीच परंपरा या शैक्षणिक वर्षात कायम राहणार असल्याचे कॉलेजचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे, नागवडे कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस, जिल्हा बँक संचालिका सौ.अनुराधाताई नागवडे, दिपकशेठ नागवडे, सेक्रेटरी, निरीक्षक सचिनराव लगड, सर्व विश्वस्थ, रसायनशास्त्र विभागप्रमुख व कॉलेजमधील सर्व कर्मचारी वृदांनी अभिनंदन केले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.