By : Polticalface Team ,Sun Sep 04 2022 18:59:32 GMT+0530 (India Standard Time)
अहमदनगर- दौंड या मार्गावर कोळगाव एक एसटी बस बंद पडली होती. यावेळी आमदार निलेश लंके यांनी आपली गाडी थांबवत बस लोटण्यास मदत केली. पण तरी देखील बस सुरु झाली नाही. मग आमदार निलेश लंके यांनी स्वतःच बसच्या स्टेअरिंगची धुरा आपल्या हातात घेतली.
बसची स्टेअरिंग हातात घेताच बस सुरु झाली. बस बंद पडल्याने अडकून पडलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, आमदार कसा असावा? याचे उदाहरण म्हणजे आमदार निलेश लंके आहेत, अशी भावना यावेळी प्रवाशांनी व्यक्त केली वाचक क्रमांक :