मढेवडगावचे ग्रामस्थ सुज्ञ आहेत. या इमारत ज्यांनी देणगी देऊन हातभार लावला, निश्चितच त्यांना ज्ञानदानाचे महत्त्व समजले -माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
By : Polticalface Team ,Mon Sep 05 2022 10:04:18 GMT+0530 (India Standard Time)
लिंपणगाव (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेने शिक्षणाच्या माध्यमातून अनेक उच्चपदस्थ अधिकारी व शास्त्रज्ञ घडविले. पूर्वी इतर शिक्षण संस्था उभ्या नव्हत्या त्याकाळी रयत शिक्षण संस्थेशिवाय पर्याय नव्हता. कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेचे रोपटे लावले. या शिक्षण संस्थेचा प्रसार वटवृक्षात झाला. आता यापुढे भविष्यात ज्या गावात रयत शिक्षण संस्थेची शाखा असेल तिथे सर्वांनी योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मढेवडगाव येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले आहे.
शनिवार दि.3/9/2022 रोजी न्यू इंग्लिश स्कुल मढेवडगाव येथे नवीन इमारत उदघाटन समारंभ माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते श्री.अजित दादा पवार साहेब यांच्या शुभहस्ते व मॅनेजिंग कौन्सिल सदस्य श्री.बाबासाहेब भोस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी व्हाईस चेअरमन श्री.भगीरथ काका शिंदे ,उपाध्यक्ष श्री.अरुण कडू पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य श्री दादाभाऊ कळमकर, उत्तर विभाग अध्यक्ष मा.आ.आशुतोष काळे ,राजेंद्र फाळके नागवडे कारखान्याचे.चेअरमन राजेंद्र नागवडे,घनश्याम आण्णा शेलार, माजी आमदार राहुल जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, सहसचिव साळुंके साहेब,,इन्स्पेक्टर श्री.कन्हेरकर मा सचिव शिवाजीराव भोर साहेब ,श्री तापकीर, तसेच जनरल बॉडी सदस्य ,आजी माजी मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मा उपमुख्यमंत्रुी अजित दादा पवार पुढे म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेची मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. यापुढे कर्मवीर अण्णांचे स्वप्न अखंडपणे पुढे चालू ठेवण्यासाठी रयत शिक्षण संस्थेकडे सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, आता रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून शरच्चंद्रजी पवार साहेब हे रयत शिक्षण संस्थेचा उत्तम प्रकारे कारभार पाहत आहेत. असे सांगून श्री पवार पुढे म्हणाले की, मढेवडगावचे ग्रामस्थ सुज्ञ आहेत. या इमारत ज्यांनी देणगी देऊन हातभार लावला, निश्चितच त्यांना ज्ञानदानाचे महत्त्व समजले आहे. असे सांगून ते पुढे म्हणाले की, कोरोना नंतर आता जनजीवन पूर्वपदावर येऊन सर्वत्र आनंदी वातावरण तयार होत आहे. यापुढे सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी. असे सांगून गणेश उत्सवानिमित्त सर्वांना यावेळी अजित दादांनी शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे मुख्याध्यापकश्री.भारत हिंगसे सर यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी श्री अजितदादा पवार यांनी आपल्या भाषणात विद्यालयाच्या इमारत बांधकामाची प्रशंसा केली. याबद्दल या गावातील सर्व ग्रामस्थ ,मुख्याध्यापक श्री.हिंगसे सर व सर्व शिक्षक वृंद यांचे अभिनंदन केले.
आभार श्री बाबासाहेब भोस यांनी मानले
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद