आमदार राहुल कुल यांच्या हस्ते पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या ३ कोटी ४ लाख रुपयांचे विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा संपन्न
By : Polticalface Team ,Mon Sep 05 2022 10:06:37 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
सह प्रमोद शितोळे,
दौंड ता ०४/०९/२०२२, दौंड तालुक्यातील मौजे पिंपळगाव तालुका दौंड जिल्हा पुणे, येथील ग्रामपंचायतीच्या विकास कामांचे भूमिपूजन लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार अँड राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आले, पिंपळगाव ग्रामपंचायतच्या विविध विकास कामांसाठी आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याने ३ कोठी ४ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली होती, या वेळी गावातील जेष्ठ गुणवंतांचा नागरी सत्कार श्रीफळ पुष्प देऊन करण्यात आला, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे दौंड तालुका अध्यक्ष माऊली ताकवणे, यांनी भुषविले, प्रमुख पाहुणे म्हणून, पुणे पीएमआरडीए आयुक्त रामदास जगताप नामदेव बारवकर, सौ उषाताई चव्हाण,सौ मायाताई जावळे मंदाकिनी शितोळे, प्रामुख्याने यांची उपस्थिती होती, या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार अँड राहुल कुल बोलताना म्हणाले, गाव मोठं आणि कार्यालय मात्र छोटं, ? दौंड तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये पिंपळगावचा समावेश होतो, गावची लोकसंख्या देखील अधिक आहे, मात्र नुकतच उद्घाटन केलेलं कार्यालय हे गाव मोठं आणि कार्यालय छोटं असं झालं असल्यामुळे मला अजिबात आवडले नाही, त्यामुळे भविष्यात ग्रामपंचायतीने कार्यालयासाठी जागेची व्यवस्था करावी, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमदार राहुल कुल यांनी घेतली आहे, तसेच दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा असणारा भीमा पाटस सहकारी साखर कारखाना, लवकरच सुरू होणार असून, एक आठवडेभरात शेतकऱ्यांना गोड बातमी मिळेल,असे म्हणताच सभेतील शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले, दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र प्रांत कार्यालय व्हावे यासाठी अनेक वर्षापासून आपण लढा देत आहोत यासाठी देखील सरकार सकारात्मक असुन पुढील महिन्यात यासंदर्भात हरकती व सूचना मागविण्यात येतील, तीन महिन्यात प्रांत कार्यालया बाबत योग्य तो निर्णय होईल असे राहुल कुल यांनी सांगितले,
तसेच दौंड तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा महत्त्वाच्या विषयावर आमदार राहुल कुल यांनी शेतकऱ्यांचे लक्ष केंद्रित केले, तसेच तालुक्यातील संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता महत्वाची असून भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, खडकवासला धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले, त्यामुळे आगामी काळात पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे, मुळशी धरणाचे पाणी दौंड तालुक्याला मिळावे यासाठी मी सात वर्षापासून प्रयत्नशील आहे, राज्यातील शिंदे फडणवीस सरकार या साठी सकारात्मक असल्याचे राहुल कुल यांनी सांगितले, या वेळी प्रामुख्याने भीमा सहकारी साखर कारखाना आजी माजी सदस्या तसेच पिंपळगाव ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सौ मंगल थोरात उपसरपंच नितिन नातु माजी उपसरपंच राजाभाऊ दिवेकर भीमा पाटस सहकारी साखर कारखाना संचालक चंद्रकांत नातु सर्व सदस्य तसेच पिंपळगाव सोसायटीचे आजी माजी चेअरमन व्हाईट चेअरमन संचालक तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद