By : Polticalface Team ,Tue Sep 06 2022 10:17:48 GMT+0530 (India Standard Time)
अमित शाह यांनी 150 चा नारा यावेळी दिला त्याला प्रत्युत्तर महापौर पेडणेकर यांनी दिलं आहे. मुंबईकरांना तुमचे धोके आणि खोके देखील नको आहेत. शिवाय आम्ही पहिल्यापासूनच जमिनीवर आहोत, आम्हाला काय जमीन दाखवणार, तुम्ही आस्मानात आहात ते आम्ही तुम्हाला जमिनीवर आणू, लवकरच भाजपला त्यांची जागा दाखवू असा इशाराही त्यांनी दिला आहे.
राजकारणात सगळं काही सहन करा मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावं. आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांच्या या टिकेला शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलं आहे वाचक क्रमांक :