By : Polticalface Team ,Tue Sep 06 2022 13:16:52 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदे तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या बैठकीत मतदान होऊन अविश्वास ठराव फेटाळण्यात आला . तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या मांडवगण ग्रामपंचायतमध्ये लोकनियुक्त अडवून सार्वजनिक हिताचे कामास बाधा निर्माण करणे , शासकीय कामे मंजूर असतांना व निधी देखील ग्रामपंचायतीस प्राप्त झालेला असतांना जाणीवपूर्वक काम करत नसल्याच्या कारणावरून श्रीगोंदे तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्याकडे ३० ऑगस्ट रोजी अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता . तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता मांडवगण ग्रामपंचायत येथे बैठक आयोजित करण्यात येऊन झालेल्या अविश्वास ठरावाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडीत गुप्त पद्धतीने मतदान होऊन ठराव दाखल करणाऱ्या गटाचे ११ जणांनी ठरावाच्या बाजूने तर ४ जणांनी ठरावाच्या विरुद्ध मतदान केले . अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी दोन तृतीयांश मते म्हणजेच १५ पैकी १२ मते ठरावाच्या बाजूने पडणे आवश्यक असल्याने श्रीगोंदे तहसीलदार कुलथे यांनी अविश्वास ठराव नामंजूर केला . वाचक क्रमांक :