दौंड तालुक्यात अशा प्रकारे प्रथम कार्यक्रम, आम आदमी पार्टीच्या वतीने
शिक्षक दिना, निमित्ताने शिक्षकांचा सत्कार समारंभ संपन्न
By : Polticalface Team ,Tue Sep 06 2022 18:23:35 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
सह प्रमोद शितोळे,
दौंड ता ०६/०९/२०२२, दौंड शहरातील शासकीय शाळेतील व विविध शैक्षणिक संस्था मधील कार्यरत असलेले व सेवानिवृत्त झालेल्या गुरुवर्य शिक्षकांचा ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्ताने व्यासपीठावर असलेल्या डॉ, राधाकृष्णन सर्वपल्ली, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, यांच्या प्रतिमेचे पूजन करून, अभिवादन करण्यात आले, यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक, आम आदमी पार्टीचे दौंड तालुका व शहर संयोजक रवींद्र जाधव, यांनी केले, शिक्षणाच्या बाबतीत केजरीवाल पॅटर्न देशात व परराज्यात डंका वाजत आहे, याचा दौंड तालुक्यातील शिक्षकांनी अभ्यास करावा, व आपल्या तालुक्यात त्याचा उपयोग कसा करून घेता येईल, याचा विचार देखील शिक्षकांनी करावा, वेळ पडल्यास आम्ही शिक्षकांबरोबर आहोत निश्चित सहभागी होऊन मदत करू, असे विश्वासाने आश्वासन दिले, आजच्या शिक्षणाची पद्धत व संविधानाने नागरिकांना दिलेला अधिकार, आणि धर्मनिरपेक्ष शिक्षणाचा दर्जा ढासळला असल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल हे पाहणे महत्त्वाचे व काळाची गरज ओळखून अभ्यासक्रम असला पाहिजे या विषयी मार्गदर्शन करण्यास आनंद वाटेल,असे परखड वक्तव्य कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवरांनी विचार व्यक्त केले, दौंड आम आदमी पार्टीच्या वतीने दौंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व विविध शिक्षण संस्थेच्या मान्यवरांचा व गुरुवर्य शिक्षकांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, या प्रसंगी आम आदमी पक्षाच्या वतीने, क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले व माता सावित्रीबाई फुले, यानी बहुजन दलित अस्पृश्य मुला मुलींना व महिलांन वरील शिक्षाणाची बंदी उठवली, आणि मुला मुलींना व महिला वर्गाला शिक्षण खुले केले, भारतातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले, तर प्रथम प्राध्यापिका म्हणून फातिमा शेख यांचे नाव पुढे येते, अस्पृश्यांना शिक्षण रुपी ज्ञान देण्याचे महान कार्य केले, विद्येची देवता सरस्वती नसून साक्षात सावित्री ज्योतिबा हेच खरे विद्येचे दैवत असल्याचे अनेक विचारवंतांनी सांगितले आहे, मानवतावादी विचाराची पिढी घडविण्यासाठी, गुरुवर्य शिक्षक ज्ञानदानाचे महान कार्य जोमाने करत आहेत, त्यांच्या या कार्याप्रती कृतज्ञता बाळगुन दौंड तालुका आम आदमी पार्टीच्या वतीने.५ सप्टेंबर, शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्याचे सांगण्यात आले आहे, या प्रसंगी शहरातील शाळा
संत तुकडोजी विद्यालय, गॅरेला हायस्कूल, सेंट सॅबस्टियन हायस्कूल, आगरवाल विद्यालय, दौंड महाविद्यालय, मेरी मेमोरियल हायस्कूल, मंगेश मेमोरियल हायस्कूल, भाऊसाहेब भागवत विद्यालय, शेठ जोतिप्रसाद विद्यालय, कन्या विद्यालय, ठोंबरे विद्यालय, शहिद जवान हायस्कूल, जि.प.शाळा गिरीम, वायरलेस फाटा, गोपाळवाडी इत्यादी शाळा/महाविद्यालयातील गुरुवर्य गुणवंत, किर्तीवंत कार्यरत असलेले शिक्षक शिक्षिका व सेवानिवृत्त विविध शिक्षण संस्थेच्या आजी, माजी शिक्षक गुरुवर्य अशा सर्वांचा सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन तंब्बल ३५ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सौ.सरोदे, जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक मा.मधुकर जाधव, मोहन झोपे, सौ अर्चना साने, कृष्णाजी गावडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आम आदमी पक्षाचे दौंड तालुका व शहर संयोजक रवींद्र जाधव, यांनी व्यक्त केले. या प्रसंगी सर्व शाळांमधील शिक्षक वर्ग व पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दौंड तालुक्यात प्रथमच शिक्षक दिनाच्या निमित्ताने अशा प्रकारे आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिक्षकांचा सन्मान दौंड तालुक्यात कधीच झाला नाही, याचा उल्लेख सत्कारार्थी शिक्षकांनी आवर्जून केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम आदमी पक्षाचे, संतोष शिंदगणे, तुषार जाधव, विनायक गवळी, भिवाजी राऊत, शाम महामुनी, हासू मोटवानी, शुभम धेंडे, विन्सेंट रंगन, शशिकांत वंटे, राकेश अग्रवाल व इतर सदस्यांनी चिकाटीने मदत केली. शहर महिला आघाडी प्रमुख नीना जोसेफ, शहराचे सचिव संतोष शिदगणे, यांनी सुत्रसंचलन केले व दौंड तालुका महिला आघाडी प्रमुख सौ.शुभांगी धायगुडे, यांनी या कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचे आभार प्रदर्शन व्यक्त केले. नंतर सर्वांनाअल्पोपहार कार्यक्रम करण्यात आला,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.
दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न