नगर सोलापूर महामार्गावर मांदळीनजीक भीषण अपघात ; तिघांचा मृत्यू
By : Polticalface Team ,Tue Sep 06 2022 21:37:01 GMT+0530 (India Standard Time)
करमाळा प्रतिनिधी
नगर सोलापूर महामार्गावर मांदळीनजीक भीषण अपघात झाला असून यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. इतर एका तरुणावर अहमदनगर येथे उपचार सुरू आहे, सोमवार (दि.५ सप्टेंबर) रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून यामध्ये स्विफ्ट कार व मालवाहतूक ट्रक यांचा समावेश आहे. अपघातातील तीनही मयत तरुण कर्जत तालुक्यातील थेरगाव येथील असून सदर घटनेमुळे थेरगाव गावावर शोककळा पसरली आहे.
तालुक्यातील थेरगाव येथील चार तरुण घोगरगाव येथून चारचाकी वाहनाने गावाकडे येत असताना मांदळी नजीक हा भीषण अपघात झाला,मिरजगावच्या दिशेने जाणारी स्विफ्ट कार अहमदनगरच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक च्या पुढील चाकाच्या बाजूला व रस्ता दुभाजकावर जोरदार आदळली आहे. हा अपघात इतका भयानक होता की कार गाडीचे इंजिन बाजूला फेकले गेलेले आहे, अपघातानंतर तरुणही बाहेर फेकले गेले होते असे सांगण्यात येत आहे. या अपघातात निलकंठ माने (वय ३२ वर्ष) , शरद पिसाळ (वय ३० वर्ष) दोघे राहणार थेरगाव ता कर्जत या दोघांचा जागीच मृत्यू झाला तसेच इतर दोन जखमींना उपचारासाठी तात्काळ अहमदनगर येथे हलविण्यात आले होते, मात्र उपचारासाठी नेत असताना धर्मराज सकट ( वय २८ वर्षे) (रा. थेरगाव ता कर्जत) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तसेच सोन्या सकट (वय २४ वर्षे) या तरुणावर अहमदनगर येथे उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच मिरजगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते, जीवणज्योत अंबुलन्स चे लहू बावडकर हे अंबुलन्स घेऊन आले तसेच थेरगावचे सरपंच रविंद्र महारणवर, मांदळीचे उपसरपंच धनेश गांगर्डे, नागमठाण चे सरपंच देविदास महारणवर, शोभचंद शिंदे, उपसरपंच रामा शिंदे, सुधीर बचाटे, स्वप्नील शहाणे, परशुराम बावडकर, पोलीस पाटील ईश्वर जोगदंड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी जखमींना तात्काळ मदत करून रुग्णालयात हलविले. मृतांना कर्जत येथे शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले आहे. अपघातामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.