शिक्षक संघाची मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्यासोबत भेट व शिक्षकांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक,सविस्तर चर्चा

By : Polticalface Team ,Tue Sep 06 2022 23:26:47 GMT+0530 (India Standard Time)

शिक्षक संघाची मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्यासोबत भेट व शिक्षकांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक,सविस्तर चर्चा मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री.एकनाथजी शिंदे साहेब व शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दीपकजी केसरकर साहेब यांची आज दिनांक 6 सप्टेंबर 2022 रोजी मुख्यमंत्री कार्यालय,मंत्रालय,६ वा मजला,मुंबई व मा.ना.दीपकजी केसरकर साहेब यांचा नरिमन पॉईंट येथील रामटेक बंगला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शिक्षक संघाचे आदरणीय नेते श्री.संभाजीराव थोरात तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली व सातारा शिवसेना जिल्हाप्रमुख सन्माननीय श्री.पुरुषोत्तम जाधव साहेब तसेच छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान सातारा जिल्हा अध्यक्ष श्री.शिवाजीराव भोसले यांच्या समवेत शिक्षकांच्या प्रश्नाबाबत भेट घेऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली.MS-CIT चा मुद्दा आमदार प्रकाश आबीटकर व शिक्षक नेते आदरणीय संभाजीराव थोरात तात्या यांनी मुख्यमंत्री यांच्यापुढे मांडला असता तात्काळ फाईल घेऊन या मी लगेच सही करून देतो असे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले.. त्यामुळे येत्या एक महिन्यात MS-CIT ची फाईल निकाली निघाला आपले गुरुजी उपक्रमांतर्गत वर्ग खोल्यांमध्ये शिक्षकांचे Aफोर साईज फोटो वर्गात लावणे या विषयाबाबत चर्चा केली असता दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी पुणे येथे होणाऱ्या बैठकीमध्ये तो निर्णय मागे घेतला जाईल अशी ग्वाही शिक्षण मंत्री महोदय यांनी दिली.

शालेय पोषण आहाराचे मागील पाच वर्षाचे ऑडिट शाळा स्तरावर न करता तालुकास्तरावर करण्यात यावे.आम्हाला शिकवू द्या" यासाठी प्राथमिक शिक्षकांकडे असणारे बीएलओ व इतर अशैक्षणिक कामे आणि अनावश्यक उपक्रम बंद करणे बाबतचे आदेश काढण्यात येतील असे मंत्री महोदयांनी सांगितले प्राथमिक शिक्षकांमध्ये उच्चशिक्षित असणाऱ्या शिक्षकांना प्रमोशन देण्याबाबत अर्थ विभाग व प्रशासन विभाग यांच्याशी चर्चा करण्यात आली असून लवकरच तो निर्णय घेण्यात येईल. जुनी पेन्शन बाबत चर्चा केली असता तो निर्णय फक्त प्राथमिक शिक्षकांसाठी लागू न करता सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू करावा लागेल यासाठी मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय, अर्थमंत्री साहेब यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.

शिक्षण सेवकांचे मानधन वाढविण्यात येणार आहे... बाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल असे मंत्री महोदयांनी सांगितले. केंद्रप्रमुख व इतर पदे भरण्याबाबत मुख्यमंत्री महोदय अनुकूल असून त्यांनी ५ सप्टेंबर रोजी सांगितले आहे वस्तीशाळा शिक्षकांच्या जुन्या सेवेबाबत मंत्री महोदय यांनी अनुकूल मत व्यक्त केले विषय पदवीधर शिक्षकांना विषयनिहाय 30 टक्के रद्द करून सर्वांना पदवीधर वेतनश्रेणी देण्याबाबत चर्चा करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याबाबत अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून पुढील वर्षापासून सुरू करण्यात येईल येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून बहुभाषिक पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्राथमिक शाळांना नवीन प्रकारच्या इमारती, शाळेची विज बिल, ब्रॉड ब्रँड कनेक्शन, पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी याबाबत चर्चा करण्यात आली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना १०/२०/३० ची आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी जानेवारी 2004 नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीमध्ये होणार्‍या वेतन त्रुटीचे निराकरण करून बक्षी समितीचा खंड दोन अहवाल प्रसारित करण्यात यावा राज्य व जिल्हा पातळीवर पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पूर्वीप्रमाणे एक जादा वेतन वाढ देण्यात यावी

वैद्यकीय उपचारासाठी शिक्षकांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी शिक्षक मतदार संघासाठी माध्यमिक शिक्षकांप्रमाणेच प्राथमिक शिक्षकांनाही मतदानाचा अधिकार मिळवून देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करणार माननीय मुख्यमंत्री महोदय व शालेय शिक्षण मंत्री महोदय यांनी वरील प्रश्र्नांची सोडवणूक करण्याचे आश्वासन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिले. तसेच वरील काही प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत शिक्षण मंत्री महोदयांनी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाच्या समवेत व उपस्थितीत मंत्रालयातील त्यांच्या दालनात पत्रकार परिषदेत लगेच घोषणाही केली. तसेच उर्वरित प्रश्नांबाबत पुन्हा अधिकाऱ्यांसमवेत एक बैठक आयोजित करण्याचे मान्य केले याप्रसंगी राज्य संघाचे अध्यक्ष अंबादासजी वाजे, समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकर काठोळे,शिक्षक संघाचे राष्ट्रीय सचिव बाळासाहेब झावरे, कार्यकारी अध्यक्ष म.ज.मोरे, सरचिटणीस आबासाहेब जगताप, सरचिटणीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षण संघ महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष उत्तमराव वायाळ, राज्य सदस्य मिलिंद गांगुर्डे, घाडगे साहेब, संजय भोर,पत्रकार किरण भुजबळ इत्यादी पदाधिकाऱ्यांचा शिष्टमंडळात समावेश होता...

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.