आगामी काळात बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपचे लक्ष, चंद्रकांत बावनकुळे यांचे वक्तव्य
By : Polticalface Team ,Wed Sep 07 2022 20:13:48 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
सह प्रमोद शितोळे,
पुणे दौंड ता,०६/०९/२०२२,बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची सत्ता वर्चस्व मागील चाळीस वर्षा पासून आहे, मतदारांनी मतदान केले म्हणूनच, बारामतीचा विकास झाला, बारामतीवर कोणी उपकार केले नाहीत, अशी घनाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे,
पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बारामतीतील मुक्ताई लॉनमध्ये पुणे जिल्हा ग्रामीण विभाग संघटनात्मक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या प्रसंगी बावनकुळे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना म्हणाले, या प्रसंगी बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी राम शिंदे आमदार गोपीचंद पडळकर, दौंड तालुक्याचे आमदार अँड राहुल कुल, आमदार भीमराव तापकीर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्य मंत्री बाळा भेगडे, भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष वासुदेव नाना काळे, जालिंदर भाऊ कामठे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भीमराव तापकीर,संदीप गिरे, भारतीय जनता पार्टीचे महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा कांचन कुल, योगेश गोगावले, दौंड तालुका भाजप अध्यक्ष माऊली ताकवणे, तानाजी दिवेकर, पश्चिम महाराष्ट्र किसान मोर्चा समन्वयक गणेश आखाडे पाटिल, सुदर्शन चौधरी, या आढावा बैठकीत प्रामुख्याने पुणे जिल्हा ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, बारामती लोकसभा मतदारसंघ निवडणुकीचा प्रारंभ म्हणून मौजे कन्हरी गावातील जागृत ग्रामदैवत हनुमान मंदिरात दर्शन घेऊन नारळ फोडण्यात आला, तसेच काटेवाडी येथिल भूथवर जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, अहिल्यादेवी होळकर चौकातून ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत कार्यकर्त्यांच्या रॅलीत बावनकुळे व मान्यवरांनी सहभाग घेतला होता, तसेच कसबा पेठेतील युवा ओरियन्स शाखेचे उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले, येथिल भाजप कार्यालयात येथे जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली, मोरगाव येथे बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक बुथ प्रतिनिधी यांच्या बैठका घेऊन, आगामी निवडणूकीसाठी जोमाने तयारी करण्याचे भाजप बुथ प्रतिनिधींना व कार्यकर्त्यांना आवाहन केले, तसेच काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचाराने चालणारी शिवसेना हि खरी असू शकत नाही, खरी शिवसेना हिंदुत्वाचा विचार घेऊन चालणारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आहे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली असल्याचा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे, पुढे बोलताना म्हणाले मागील अडीच वर्षात ओबीसी आरक्षण महाविकास आघाडीला टिकवता आले नाही, देवेंद्र फडणवीस यांचाच पुढाकार घ्यावा लागला, तसेच मराठा आरक्षण ही मिळवून देणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले,
बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमनजी यांच्यावर सोपवली आहे, त्यांचा दौरा या महिन्यात होणार असुन, आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीला येऊन सभा घेणार असल्याचे बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बावनकुळे यांनी सांगितले,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.