पुणे जिल्ह्यात चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता,(येलो अलर्ट) लागु नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आपत्ती व्यवस्थापन विभागाचा इशारा
By : Polticalface Team ,Wed Sep 07 2022 23:54:20 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
सह प्रमोद शितोळे,
पुणे,दौंड ता ०७/०९/२०२२, पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, येत्या चार दिवसात मुसळधार पावसाची दाट शक्यता असल्याचे दौंड तालुका तहसीलदार संजय पाटील यांनी सांगितले आहे, प्रादेशिक हवामान विभागाच्या माध्यमातून मिळालेल्या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यात दि,०७/०९/२०२२, ते ११/०९/२०२२ पर्यंत पूर्ण जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला असल्याचे, जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी जाहीर केले आहे, पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी या चार दिवसाच्या कालावधीत तुरळक ठिकाणी मेघ गर्जने सह पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी या चार दिवसाच्या कालावधीत स्वतःची व कुटुंबातील सदस्य यांनी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे यांच्या मार्फत नमूद करण्यात आले आहे, या कालावधीत पाऊस किंवा आभाळात विज चमकत असेल तर आपल्या घरातील विद्युत (लाईट) वर चालणाऱ्या वस्तू टीव्ही संगणक फ्रिज व इतर अनेक काही असतील त्या वस्तू, तत्काळ बंद करून स्विच बोर्ड पासून वेगळ्या करून ठेवाव्यात, पावसात वीज चमकत असेल तर मोबाईल वरून बोलण्याचे टाळावे, पाऊस सुरू असल्यास घराबाहेर जाण्याचे टाळावे, या प्रसंगी बाहेर असाल तर आपल्या स्वतःची काळजी घेऊन सुरक्षित ठिकाणी थांबावे, मोठ्या व उंच झाडाखाली किंवा लाईटीच्या खांबाजवळ थांबु नये, कदाचित आपण मोकळ्या मैदानात असाल तर अचानक वीज चमकत असेल तर कानाला दोन्ही हात लावून, गुडघ्याच्यामध्ये डोके घालून खाली बसावे, मुसळधार पाऊस सुरू असताना घराबाहेर जाणे टाळावे, सर्वात महत्त्वाचे या चार दिवसात नागरिकांनी विनाकारण मोटर सायकल किंवा चार चाकी वाहन घेऊन बाहेर जाण्याचे टाळावे,
मुसळधार पावसामुळे परिसरात ओढ्याला आलेल्या पूराचे पाणी पाहण्यासाठी म्हणून जाऊच नये, कदाचित कोणी अशावेळी शेतात किंवा मळ्यात अडकल्यास कमी पाणी समजून अलीकडे पलीकडे जाण्याचे टाळावे, मुसळधार पावसामुळे कुठल्याही प्रकारची दुर्घटना किंवा जास्ती प्रमाणात पाणी साठा झाला असेल व त्यामुळे इतरांना धोका निर्माण होऊ शकतो, ? दुर्घटना होऊ नये याची दक्षता घेऊन अशा ठिकाणाची तत्काळ माहिती आपत्कालीन जिल्हा नियंत्रण कक्ष संपर्क नंबर (०२०)२६१२३३७१ किंवा टोल फ्री नंबर १०७७ या नंबर वर संपर्क साधावा असे दौंड तहसीलदार संजय पाटील व जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या मार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.