लग्नाचे आमिष दाखवत विधवा महिलेवर वारंवार जबरदस्तीने अत्याचार.

By : Polticalface Team ,Thu Sep 08 2022 11:41:33 GMT+0530 (India Standard Time)

लग्नाचे आमिष दाखवत विधवा महिलेवर वारंवार जबरदस्तीने अत्याचार. श्रीगोंदा : तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका विधवा महिलेच्या दुबळ्यापणाचा फायदा घेत, त्याच्याकडेच ड्रायव्हर असलेल्या इसमाच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीवर वाईट नजर ठेवून, लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार जबरदस्तीने अत्याचार केले. याबाबत पीडितेने श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीनंतर सदरील प्रकार समोर आलेला आहे.. तर, याप्रकरणी आरोपी अतीक कुरेशी याला पोलिसांनी त्याच्या स्कॉर्पिओ गाडी सह ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, माहे ऑगस्ट 2021 रोजी नमूद महीलेच्या पतीला कोरोनाची लागण झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. पिडीतेचा पती, अतिक कुरेशी याच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. साधारण 2017 पासून 2020 पर्यंत अतिक कुरेशी आणि या कुटुंबाचे संबंध होते. मात्र 2021 मध्ये नमूद महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर माहे ऑक्टोबर 2021 रोजी कुरेशी हा त्या विधवा महिलेच्या घरी गेला. तीचा 14 वर्षांचा मुलगा तिच्या आईकडे गेला होता. ती घरी एकटी असल्याने अतिकने तिला तुझे पती मयत झालेले आहेत आणि माझ्या पत्नीशीही माझं पटत नसल्याने, मी तिला लवकरच तलाक देणार आहे. तिला तलाक दिल्यानंतर मी तूझ्याशी लग्न करील..! असे म्हणून, त्याने त्या विधवा महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. तिने त्याला नकार दिला. मात्र, तिला लग्नाचे आमिष दाखवून त्याने जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

विधवा असूनही तो पिडितेशी लग्न करणार असल्याने तिने त्यावेळेस त्याच्या विरुद्ध तक्रार दिली नाही. त्यानंतर त्याने वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून, तिच्याशी शरीर संबंध केले. या बाबत पीडितेने फिर्यादीत नमूद केले आहे.

यानंतर एप्रिल 2022 मध्ये अतीक हा त्याची स्कॉर्पिओ गाडी घेऊन तिच्या घरी आला असता, त्यावेळी तिने त्याला लग्नाबाबत विचारणा केली. त्याने आपण बाहेर जाऊन बोलू म्हणून, तो तिला गाडीमधून राहते घरून जामखेड रोड नजीक कुकडी कॅनॉलच्या 14 नंबर चारि रस्त्याने थोडे आत घेऊन गेला. तिथे गाडी थांबून त्याने तिला थोडे थांब.. मी एक महिन्यात पत्नीला तलाक देऊन, तुझ्याशी लग्न करतो.. असं म्हणाला. त्यानंतर तो गाडीमध्येच शरीरसंबंधाची मागणी करू लागला. अगोदर माझ्याशी लग्न कर..! असे ती म्हणाल्याने त्याने इच्छाविरुद्ध जबरदस्तीने तीच्याशी संबंध केला.

त्यानंतर आज पर्यंत त्याला वेळोवेळी समक्ष भेटून तसेच फोनवर संपर्क साधून लग्नाबाबत तिने विचारले असता, त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला व जबरदस्तीने अत्याचार केलेबाबत भाऊ आणि आईला तिने सांगितले.

तिच्या विधवापणाचा गैरफायदा घेऊन, त्याने तिला तुझे पती मयत झालेले आहेत आणि माझे पत्नीशी पटत नसल्याने तिला तलाक देऊन, तुझ्याशी लक्ष लग्न करेल. असे लग्नाचे आमिष दाखवून... वारंवार तिच्याशी घरी व गाडीमध्ये शारीरिक संबंध केले आणि आता लग्नाला नकार दिल्याने, त्या विधवा महिलेने अतीक कुरेशीच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार अतिक कुरेशी या एका जिम्मेदार संघटनेच्या जिल्हाध्यक्षावर भादवि कलम 376, 417 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(2)(v) व 3(2)(va) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी, कर्जत श्री.अण्णासाहेब जाधव व पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली API जाणकार हे करीत आहेत.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.