लिंपणगाव चा गाव तलाव कोकडीच्या पाण्यातून शंभर टक्के भरला ग्रामपंचायत प्रशासनाकडून अधिकाऱ्यांची आभार

By : Polticalface Team ,Thu Sep 08 2022 17:30:21 GMT+0530 (India Standard Time)

लिंपणगाव चा गाव तलाव कोकडीच्या पाण्यातून शंभर टक्के भरला ग्रामपंचायत प्रशासनाकडून अधिकाऱ्यांची आभार लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील धार्मिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लिंपणगाव येथील गाव तलावात कुकडीचे ओव्हर फ्लो चे पाणी सोडल्याने ग्रामस्थांसह ग्रामपंचायत प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान या कामी कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे, विसापूर सिंचन चे उपविभागीय अधिकारी श्री फडतरे, श्री डफळ, श्री नानासाहेब पवार, श्री पालवे आदी कुकडीच्या अधिकाऱ्यांनी मौलिक सहकार्य केल्याने गाव तलाव पाणी सोडण्यात अडचण भासली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान लिंपणगाव हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असल्याने या गावालगत सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागे गावचा मोठा तलाव आहे. परंतु या गाव तलावात पाऊस मुसळधार झाला असला तरी या गाव तलावात पाणी जात नाही. त्यामुळे ऐन उन्हाळी हंगामात या गाव परिसरात पाण्याची भीषण टंचाई जाणवते असे ग्रामस्थांनी सांगितले. सद्यस्थितीला कुकडीचे ओवर फ्लॉचे पाणी श्रीगोंदा तालुक्यात सोडण्यात आले आहे त्या पाण्यातून लिंपणगावच्या गाव तलावात पाणी सोडण्याची मागणी गावच्या सरपंच शुभांगीताई जंगले, उपसरपंच अरविंद कुरुमकर, यांच्यासह स्थानिक ग्रामपंचायतीच्या सदस्य शामराव लष्करे, सौ छायाताई रेवगे यांच्यासह ग्रामपंचायतच्या सर्वच सदस्यांनी एकमुखी मागणी करत गाव तलावात पाणी सोडण्यासाठी कुकडीच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. या कामी गावचे पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांना देखील गाव तलावात पाणी सोडण्यासाठी अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी गावचे सरपंच शुभांगीताई जंगले व उपसरपंच अरविंद कुरुमकर यांनी सहकार्य करावे अशी विनंती केली. पत्रकार कुरुमकर यांनी तात्काळ विसापूर सिंचनचे उपविभागीय अधिकारी श्री फडतरे यांच्याशी तात्काळ संपर्क साधून लिंपणगाव ग्रामपंचायत गावात तलावात पाणी सोडण्यासंबंधीच्या भावना अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. परंतु फडतरे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाने लवकर पाण्यासंदर्भात मागणी करायला हवी होती असे मत मांडले. परंतु या ओव्हरफलोच्या पाण्यासंदर्भात काहीतरी मार्ग काढावा लागेल अशी गळ पत्रकार कुरुमकर यांनी फडतरे यांच्यापुढे मांडली. परंतु श्री फडतरे यांनी तुम्हाला कार्यकारी अभियंता श्री काळे साहेब यांच्याशी संपर्क करावा लागेल असे सांगितले. पत्रकार कुरुमकर यांनी पुन्हा तात्काळ कुकडीचे कार्यकारी अभियंता श्री स्वप्निल काळे साहेब यांच्याशी संपर्क साधून लिंपणगावच्या गाव तलावात ओव्हरफ्लोचे पाणी सोडणे अत्यंत गरजेचे असून, पाऊस जरी झाला असला तरी पावसाचे पाणी या गाव तलावात जात नाही. त्यामुळे कुकडीचे गावाच्या पायथ्यापासून जाणारे पाणी मिळाले पाहिजे अशी भावना कुरुमकर यांनी मांडली तसेच तलावाच्या पाण्याची पातळी देखील खोलवर गेलेली आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात जनावरांसह गाव परिसरातील पाणी प्रश्न गंभीर बनतो अशी सविस्तर पार्श्वभूमी पत्रकार कुरुमकर यांनी कार्यकारी अभियंता काळे साहेबांपुढे मांडली .ही सर्व पार्श्वभूमी मांडल्यानंतर कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांनी तात्काळ उपविभागीय अधिकारी श्री फडतरे यांच्याशी संपर्क साधून लिंपणगावच्या गाव तलावात पाणी सोडण्यासाठी मान्यता दिली. गेल्या दोन दिवसापासून कुकडीचे 132 मधून वाढीव पाणी देऊन सध्या दोन दिवसापासून कुकडीचे पाणी लिंपणगावच्या गाव तलावात वाहताना दिसत आहे. गाव तलावाच्या पाण्याची पातळी समाधानकारक दिसून येत आहे. निश्चितच कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांनी ग्रामपंचायत प्रशासन स्थानिक पत्रकार व ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन गाव तलावात पाणी सोडण्यासंदर्भात मौलिक सहकार्य केले. त्याबद्दल लिंपणगाव ग्रामस्थांसह गावचे सरपंच, उपसरपंच तसेच सर्व सदस्यांनी कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे व त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक करून आभार मानले. या कामी गावचे ग्रामपंचायत बाळासाहेब माने व ग्रामपंचायत कर्मचारी विठ्ठल कुरूमकर यांनी देखील मोठे परिश्रम घेतले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.