यवत गावातील विघ्नहर्ता बाप्पांची, ढोल ताशाच्या धुमधडाक्यात, आतिषबाजी करत, जंगी विसर्जनाची मिरवणूक काढली

By : Polticalface Team ,Sat Sep 10 2022 09:55:32 GMT+0530 (India Standard Time)

यवत गावातील विघ्नहर्ता बाप्पांची, ढोल ताशाच्या धुमधडाक्यात, आतिषबाजी करत, जंगी विसर्जनाची मिरवणूक काढली दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १०/०९/२०२२, यवत पंचक्रोशीतील विविध गणपती मंडळांनी विघ्नहर्ता गणरायाला ढोल ताशाच्या गजरात जंगी विसर्जन मिरवणुक काढण्यात आली होती, यवत येथील नूतन तरुण मंडळाच्या पारंपारिक विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी असलेल्या, गणपती मंडळांच्या गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहून मिरवणुकीची शोभा वाढवली होती, दौंड तालुक्यांचे आमदार अँड राहुल कुल यांच्या हस्ते नुतन तरुण मंडळाच्या गणरायाची स्थापना केली होती, विसर्जन मिरवणुक प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य,व नूतन तरुण मंडळाचे अध्यक्ष, सुरेश भाऊ शेळके, यांच्या मार्गदर्शना खाली, गणपती विसर्जन मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले होते, या वेळी मंडळाचे विश्वस्त कार्यकारी जेष्ठ नानासाहेब दोरगे महाराज, महादेव दोरगे महाराज, रमेश शेठ जैन, विजूशेठ गुजर, डॉ शाम कुलकर्णी, सरपंच समीर दोरगे,माजी सरपंच दशरथ खुटवड, माजी उपसरपंच विद्यमान सदस्य नाथदेव आबा दोरगे, आबा बोत्रे, आजी माजी जेष्ठ यवत गावातील नागरिक तसेच युवा तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते, गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत, हनुमान तरुण मंडळ यवत स्टेशन, बाप्पा मोरया मित्र मंडळ गराडे वस्ती, राजा शिवछत्रपती मित्र मंडळ सुतार वाडा, नवदीप मित्र मंडळ बाजारपेठ, अमर तरुण मंडळ इंदिरानगर,अखिल व्यापारी मंडळ बाजार पेठ, तसेच सर्व मंडळाच्या गणेश भक्तांनी उत्सुकतेने नूतन तरुण मंडळाच्या गणपती पासून यवत गाव पेठेतुन, ढोल ताशा पथकांच्या वाद्यात गणरायाची मिरवणूक श्री काळभैरवनाथ मंदिरा समोर सर्व मंडळांच्या गणरायाची आरती करून विसर्जन करण्यात आले, या वेळी नूतन तरुण मंडळाच्या वतीने अध्यक्ष सुरेश भाऊ शेळके यांच्या हस्ते,यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचा नारळ देऊन सत्कार करण्यात आला, या प्रसंगी, यवत पोलीस प्रशासनाने गेली दहा दिवस गणरायाच्या विसर्जना पर्यंत चोख बंदोबस्त व कामगिरी केल्याबद्दल नानासाहेब दोरगे महाराज यांनी आभार व्यक्त केले, या प्रसंगी बोलताना पवार साहेब म्हणाले यवत पंचक्रोशीतील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेली दहा दिवस गणेश उत्सवाचे नियमांचे पालन करून गणरायाच्या विसर्जना पर्यंत गुण्या गोविंदाने महोत्सव साजरा केला त्याबद्दल सर्व गणेश मंडळांचे व कार्यकर्त्यांचे यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी आभार व्यक्त केले, गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या असे म्हणताच, पुढल्या वर्षी ही तुम्हीच उपस्थितीत गणपती बंदोबस्त करावा अशी प्रतिक्रिया नानासाहेब दोरगे महाराज यांनी व्यक्त केली, तसेच यवत गावातील पत्रकार, हितेंद्र गद्रे, अनिल गायकवाड पोलीस कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी, महावितरण विद्युत मंडळ यवत, मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेश मंडळांचे सर्व अध्यक्ष यांना सुरेश भाऊ शेळके यांच्या हस्ते नारळ देऊन सत्कार करण्यात आला,

मिरवणुकीत गावातील तृतीयपंथी दिपा गुरु रंजिता नायक यांचे चेले, आचल गुरु दिव्या,दिव्या गुरु दिपा, ममता गुरु आचल, याना नूतन तरुण मंडळाच्या वतीने नारळ देऊन सत्कार करण्यात आला, यवत गावातील तृतीयपंथी यांनी गणपती विसर्जन मिरवणुकीत धमाल नृत्य केल्याने नागरिकांचे व गणेश भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटले,,तसेच यवत गावातील श्रीनाथ गणेश मित्र मंडळांची स्थापना दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांच्या हस्ते करण्यात आली होती,मंडळाचे अध्यक्ष विलास दोरगे, तसेच मंडळाचे विश्वस्त कार्यकारी, दिलीप शेठ यादव, जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम पंचायत समिती माजी सदस्य कुंडलीक नाना खुटवड, यवत ग्रामपंचायत माजी उपसरपंच विद्यमान सदस्य सदानंद दोरगे, वि का,सो, चेअरमन रमेश अण्णा यादव, उद्योजक बापू खुटवड, दत्तात्रेय दोरगे पाटिल, काळभैरवनाथ मंदिर समिती अध्यक्ष सतिश दोरगे पाटिल, ग्रामपंचायत माजी सदस्य साजिद भाई सय्यद, शिवसेना अध्यक्ष अशोकराव दोरगे पाटील, माणिक दोरगे पाटील, राजू भाई शेख, सुनील कदम, अण्णा दोरगे, दादा माने, बाळु कदम, यवत गावातील ग्रामस्थ व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती, श्रीनाथ गणेश मित्र मंडळाच्या वतीने या वेळी आकर्षित विद्युत रोषणाई डेकोरेशन करण्यात आले होते, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन ही केले होते, श्रीनाथ गणेश मित्र मंडळाच्या वतीने दिलीप शेठ यादव यांच्या हस्ते, नूतन तरुण मंडळाचे अध्यक्ष सुरेश भाऊ शेळके, हनुमान मित्र मंडळ यवत स्टेशन अध्यक्ष नानासाहेब दोरगे, बाप्पा मोरया मित्र मंडळाचे अध्यक्ष गराडे, अमर तरुण मंडळ इंदिरानगर,अध्यक्षांचा नारळ देऊन सत्कार करण्यात आला, तसेच श्रीनाथ गणेश मित्र मंडळाच्या वतीने यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल जगताप यांचा नारळ देऊन सत्कार करण्यात आला, विसर्जन मिरवणुकीत डीजे ढोल ताशा पथकांच्या वाद्याने गणेश भक्तांचे व यवत ग्रामस्थांचे लक्ष वेधले होते, तसेच उत्कृष्ट फटाक्यांची आतिषबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती, श्रीनाथ गणेश मित्र मंडळाच्या गणपती पासून ते पुणे सोलापूर महामार्ग लगत सेवा मार्गाने.कॅनेलमध्ये गणरायाचे विसर्जन करण्यात आले, विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले श्रीनाथ गणेश मित्र मंडळ, बाजार पेठ, त्रिमूर्ती मित्र मंडळ काशिनाथ आप्पा दोरगे वस्ती, श्री गणेश मित्र मंडळ, खुटवड वस्ती, या सर्व गणेश मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, श्रीनाथ गणेश मित्र मंडळाच्या वतीने सर्व गणेश भक्तांचे आभार व्यक्त करण्यात आले,

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद