By : Polticalface Team ,Sun Sep 11 2022 20:33:51 GMT+0530 (India Standard Time)
राष्ट्रवादीच्या अधिवेशनामध्ये पक्षातील मोठ्या नेत्यांची भाषणे पार पडली. मात्र यामध्ये अजित पवारांचा समावेश नव्हता. तर या अधिवेशनात शरद पवार यांच्या भाषणाआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाषण करतील अशी घोषणा करण्यात आली. मात्र या दरम्यानच अजित पवारांना बोलायला द्या, अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्या. तर कार्यकर्त्यांच्या घोषणा सुरु असताना अजित पवार सभागृहातून निघून गेल्याने एकच गोंधळ उडाला.
तर जयंत पाटीलांच्या भाषणानंतर अजित पवारांचे नाव पुकारण्यात आले. पण त्यांचे नाव पुकारले तेव्हा अजित पवार हे सभागृहात उपस्थित नव्हते. अजित पवार हे सभागृहात नसल्याने खासदार सुप्रिया सुळे या अजित पवारांना घेऊन येण्यासाठी बाहेर गेल्या. अजित पवारांना सभागृहात परत घेऊन आल्या. मात्र तोपर्यंत शरद पवारांनी समारोपाच्या भाषणाला सुरुवात केल्याने अजित पवारांना भाषण करता आलं नाही.
दरम्यान, कार्यक्रम सुरु असताना मध्येच अजित पवार हे सभागृहामधून उठून बाहेर गेले असल्याने अजित पवार हे पक्षावर नाराज आहेत का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. तर याबाबत त्यांनी माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण देखील दिलं आहे.
अजित पवारांनी सांगितलं की, राष्ट्रवादीचे हे 8 वे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनामध्ये देशभरातून विविध मान्यवर आणि कार्यकर्ते आले होते. त्यामुळे त्यांच्यासमोर बोलणे उचित राहणार नाही त्यामुळे बोललो नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं वाचक क्रमांक :