सेलू येथील विनायक भोसले यांनी नीट परीक्षेत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मिळवलेले यश कौतुकास्पद-डॉ. संतोष मुंडे

By : Polticalface Team ,Sun Sep 11 2022 20:36:18 GMT+0530 (India Standard Time)

सेलू येथील विनायक भोसले यांनी नीट परीक्षेत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मिळवलेले यश कौतुकास्पद-डॉ. संतोष मुंडे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील सेलू येथील विनायक भोसले यांनी नीट परिक्षेत यश संपादन केले त्याबद्दल सत्कार राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.दरम्यान अंगी जिद्द व चिकाटी असेल तर आर्थिक स्थिती अडसर ठरत नाही याचा प्रत्यय विनायकने समाजासमोर ठेवला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत परिस्थिती मिळवलेले यश कौतुकास्पद असल्याचे डॉ.संतोष मुंडे यांनी सांगितले. विनायक अर्जुन भोसले रा.सेलू ता. परळी. याच्या वडिलांचे सन-2014 मध्ये अपघाती निधन झाले. पतीच्या निधनानंतर खचून न जाता विनायकाची आई सुनीता यांनी लोकांच्या घरची धुनी-भांडी करून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. मुलांच्या शिक्षणासाठी सुनीताबाई यांनी अंबाजोगाई गाठले. आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने त्यांनी अंबाजोगाईत धुणे-भांडी करण्याचे काम सुरू केले. व एकाच छोट्याशा भाड्याच्या खोलीत हे चारजनांचे कुटुंब राहते.याच ठिकाणी सर्वजण एकत्रित अभ्यास करतात. विनायक याचे दहावीचे शिक्षण माजलगाव येथे झाले. दहावीत असताना तो स्वतः म्हशी चा सांभाळ करून दूध वाटप करून आईला आर्थिक हातभार लावत असे. मात्र अंबाजोगाईत चांगले शिक्षण असल्याने भोसले कुटुंब इथे स्थायिक झाले. विनायक ची आई सुनीताबाई कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी  आजही लोकांची भांडी घासतात.आईचे कष्ट व आर्थिक परिस्थिती याची जाणीव ठेवून विनायकने डॉक्टर होण्याची जिद्द मनात बाळगली.नीट च्या शिकवणीची फिस भरू शकत नसल्याने त्याने यूट्यूब वर अभ्यासक्रमाचे व्हिडीओ पाहून मेहनतीने अभ्यास केला.व नीट च्या परीक्षेत 595 गुण प्राप्त केले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत विनायकने जिद्दीने यश संपादन केले. त्याच्या या यशाबद्दल शनिवार, दि.10 सप्टेंबर रोजी परळीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते विनायक भोसले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.परळी सारख्या ग्रामीण भागातून अथक परिश्रमाच्या बळावर विद्यार्थी घवघवीत यश संपादन करत आहेत.परळी शहरातही अनेक शैक्षणीक संस्था विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करत आहेत.परळी शहर व परिसरातुन घडत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या उज्वल यशासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करु असेही डॉ.संतोष मुंडे यांनी यावेळी सांगितले. सत्कार प्रसंगी माजी सरपंच पद्माकर शिंदे,वचिष्ठ मुसळे, एकनाथ शिंदे , अशोक देशमुख व इतर उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.