रस्त्यांची दुरावस्था प्रकरणी, लोकप्रतिनिधी ,प्रशासकीय आधिका-यांच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ "मोफत झंडुबाम वाटप "आंदोलन:- डाॅ.गणेश ढवळे
By : Polticalface Team ,Mon Sep 12 2022 18:14:46 GMT+0530 (India Standard Time)
बीड शहरातुन जाणा-या राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापूर तसेच अहमदपूर-अहमदनगर तसेच बीड-अहमदनगर तसेच राज्यमार्ग आणि शहरांतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली असून वाहनधारकांना मोठ्या अडचणीस तोंड द्यावे लागत असून कंबरदुखी तसेच मणक्याचे आजार वाढले आहेत ,धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे शहरातुन जाणा-या १२ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे दुभाजक तसेच नाल्याचे काम अपुर्णच असुन चिखलमय रस्ता झाला आहे तसेच शहरातुन जाणारा अहमदनगर-बीड राज्य मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे तसेच शहराच्या हद्दीतील रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय,तहसिल कार्यालय,प्रशासकीय भवन,जिल्हा न्यायालयासह ईतर शासकीय कार्यालयात येणा-यांसह शहरातील नागरीकांची खड्ड्यांमुळे मोठी कसरत होत आहे. शहरांतर्गत जुना मोंढा,कारंजा रोड,नगर रोड,आदि भागातील खड्ड्याचे साम्राज्यास राजकीय नेते आणि प्रशासकीय आधिकारी जबाबदार असुन त्यांच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, यांच्या नेतृत्वाखाली दि.१२ सप्टेंबर सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "मोफत झंडुबाम तसेच वेदनाशामक वाटप आंदोलन करण्यात आले. आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर ,राहुल कवठेकर, सय्यद आबेद बीडकर,शेख मुस्ताक,माजी सैनिक अशोक येडे,सय्यद सादेक,धनंजय सानप,दिपक बांगर, किस्किंदाताई पांचाळ,सारीका गायकवाड, आदि सहभागी होते. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन देण्यात आले.
.
अपघात मृत्युप्रकरणात कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई द्या:-डाॅ.गणेश ढवळे
-
बीड जिल्ह्य़ातील राष्ट्रीय महामार्ग तसेच शहरांतर्गत रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली असून निकृष्ट रस्त्याप्रकरणात संबधित कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधांचा गुन्हा दाखल करण्यात येऊन मयताच्या कुटुंबियास नुकसान भरपाई देण्यात यावी.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद