भाजपा अनु.जाती मोर्चाचे 17 सप्टेंबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत राज्यस्तरीय वस्ती संपर्क अभियान

By : Polticalface Team ,Mon Sep 12 2022 18:38:52 GMT+0530 (India Standard Time)

भाजपा अनु.जाती मोर्चाचे 17 सप्टेंबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत राज्यस्तरीय वस्ती संपर्क अभियान मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या "कोअर कमिटी" ची बैठक मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार डॉ.भोला सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि भाजपा अनुसूचित जाती मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. बैठकीत 17 सप्टेंबर 2022 ते 26 नोव्हेंबर 2022 असे 70 दिवस चालणाऱ्या *वस्ती संपर्क अभियान* कार्यक्रमा संबंधी सविस्तर मार्गदर्शन राष्ट्रीय सरचिटणीस खासदार डॉ.भोला सिँह व प्रदेशाध्यक्ष माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी केले.वस्ती संपर्क अभियान च्या महाराष्ट्र राज्यातील एकूण 61 संघटनात्मक जिल्ह्याच्या कार्यक्रमाचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. बैठकीत भाजपा अनुसूचित जाती मोर्चा च्या प्रदेश पदाधिकाऱ्यांना वस्ती संपर्क अभियान च्या राज्यातील सर्व विभागाच्या प्रमुख जबाबदारी चे वाटप करून वस्ती संपर्क अभियान चे राज्यातील 7 विभागाचे प्रभारी नियुक्त करण्यात आले.

भारताचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या 17 सप्टेंबर रोजी असलेल्या वाढदिवसा पासून ते 26 नोव्हेंबर रोजी असलेल्या संविधान दिना पर्यंत असे 70 दिवस वस्ती संपर्क अभियान संपूर्ण देशभर व राज्यभर राबविण्यात व चालविण्यात येणार आहे.

वस्ती संपर्क अभियानात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्व मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहांना भेटी देऊन वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या सर्व मागासवर्गीय विद्यार्थी विदयार्थिनी च्या भारत सरकार च्या व राज्य सरकार च्या शिष्यवृत्ती बाबत च्या तसेच वसतिगृहातील समस्या जाणून घेतल्या जाणार असून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येणार आहे तसेच प्रत्येक जिल्ह्यातील सर्व मागासवर्गीय वस्त्यांमध्ये जाऊन अनुसूचित जातीतील जनतेच्या-अबाल वृद्धांच्या व प्रत्येक कुटुंबांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर ताबडतोब उपाय योजना करण्यात येणार आहे. केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, जिल्हा व तालुका प्रशासन व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगर पालिका, नगर परिषदा, नगर पंचायती व ग्रामपंचायत इत्यादी सर्व पातळीवरील अनुसूचित जाती समुहाच्या सर्व समस्यांचा, सोयी सुविधांच्या अभावाचा, सामूहिक, कौटुंबिक व व्यक्तिगत अडचणींचा निपटारा वस्ती संपर्क अभियानाद्वारे करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. वस्ती संपर्क अभियान मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, राष्ट्रवाद, लोकशाहीचे सशक्तीकरण, अनुसूचित जातींचा संपूर्ण विकास, अनुसूचित जाती समुहावरील अन्याय अत्याचार, शोषण, अनुसूचित जातीच्या विद्यार्थी विद्यार्थिनी व मुली यांचेवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर प्रतिबंध, शिष्यवृत्ती चे प्रश्न व भ्रष्टाचार इत्यादी अनेक विषयावर सविस्तर चर्चा करून उपाय योजना करण्यात येणार आहे. अनुसूचित जातीच्या विकासासाठी, कल्याणासाठी आणि उत्थाना साठी अस्तित्वात असलेल्या केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती या वस्ती संपर्क अभियानाच्या माध्यमातून दिली जाणार असून अनुसूचित जातीच्या प्रत्येक वस्तीतील प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक उत्थानाचे कार्य भाजपा अनुसूचित जाती मोर्चा हाती घेणार आहे.त्यासाठी नवीन कोणत्या योजना व उपाय हाती घेणे आवश्यक आहे त्यासंबंधी अनुसूचित जाती समूहाच्या प्रत्येक वस्तीतील अबाल -वृद्धांची मते व सूचना जाणून घेऊन ते सर्व सत्तेवर विराजमान नेतृत्वा समोर मांडले जाणार असून त्यावर झटपट निर्णय करण्यात येणार आहेत.

70 दिवसांच्या या वस्ती संपर्क अभियान काळात भाजपा चे अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार लालसिंह आर्य, राष्ट्रीय सरचिटणीस खासदार डॉ.भोला सिँह व प्रमुख केंद्रीय पदाधिकारी तथा महाराष्ट्र प्रदेश भाजपा चे दिग्विजयी नेते माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, वैद्यकीय शिक्षण मंत्री मंत्री ना.गिरीश महाजन, महसूल मंत्री ना.राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजाताई मुंडे,कामगार मंत्री सुरेश खाडे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.सुधाकर भालेराव भाजपाचे केंद्रीय व प्रदेश पदाधिकारी, राज्यातील सर्व भाजपा खासदार व आमदार, माजी आमदार, सर्व भाजपा जिल्हाध्यक्ष आणि अनुसूचित जाती मोर्चाचे राज्यातील सर्व प्रदेश व जिल्हा पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्यात विविध कार्यक्रम होणार असून 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनी भाजपा केंद्रीय व प्रदेश प्रमुखांच्या प्रमुख उपस्थितीत समारोपाचा भव्य व जंगी कार्यक्रम होणार आहे.

हे वस्ती संपर्क अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख व सक्रिय जिल्हा पदाधिकाऱ्यांना देण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यात 10 पदाधिकाऱ्यांची जिल्हा समिती स्थापित करण्यात येणार आहे. त्यांना त्या त्या जिल्ह्यांचे जिल्हा प्रभारी हे नियमित मार्गदर्शन व साहाय्य करणार आहेत.

प्रदेश कोअर कमिटी च्या नुकत्याच झालेल्या या बैठकीत भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी मौलिक मार्गदर्शन करून वस्ती संपर्क अभियान देशात सर्वात जास्त यशस्वी महाराष्ट्र अनुसूचित जाती मोर्चा करील असा विश्वास व खात्री व्यक्त केली.

या बैठकीत वस्ती संपर्क अभियान च्या राज्यातील सात विभागाच्या प्रभारी पदी पुढे नमूद भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली - *पूर्व विदर्भ विभाग (8 जिल्हे)* - माजी आमदार डॉ.मिलिंद माने (प्रदेश सरचिटणीस), *पश्चिम विदर्भ विभाग (7 जिल्हे)* - नितीन मोरे (प्रदेश उपाध्यक्ष), *उत्तर महाराष्ट्र / खान्देश विभाग (11 जिल्हे)* - ऍड.वाल्मिक (तात्या) निकाळजे (प्रदेश उपाध्यक्ष), *पश्चिम महाराष्ट्र(10 जिल्हे)* -प्रा.मोहन वनखंडे सर (प्रदेश सरचिटणीस), *मराठवाडा विभाग (11 जिल्हे)* - जालिंदर (दादा) शेंडगे (प्रदेश उपाध्यक्ष, *कोकण विभाग (5 जिल्हे)* -सचिन आरडे (प्रदेश सरचिटणीस), *ठाणे विभाग (9 जिल्हे)* - मयूर देवळेकर (प्रदेश उपाध्यक्ष).

दि. 15 सप्टेंबर पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात वस्ती संपर्क अभियान च्या सर्व विभागीय प्रभारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जिल्ह्यांच्या 10 सदस्सीय समित्या स्थापन करण्यात येणार असून त्याच बैठकांमध्ये वस्ती संपर्क अभियान च्या 70 दिवसांच्या सर्व कार्यक्रमांचे सविस्तर नियोजन करण्यात येणार आहे.

वस्ती संपर्क अभियान साठी नियुक्त सर्व विभागीय प्रभारी यांनी 15 सप्टेंबर पर्यंत आयोजित केलेल्या सर्व बैठकांना भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून वस्ती संपर्क अभियान पूर्णत: यशस्वी करावे आणि महाराष्ट्राची मान व शान देशात उंचावावी असे आवाहन भाजपा अनुसूचित मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.सुधाकर भालेराव . वाल्मीक निकाळजे जालिंदर शेंडगे यांनी सर्वाना केले आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद