राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील वाहनाचे बील मागीतले म्हणून गुत्तेदाराने केली गाडी बंद
By : Polticalface Team ,Mon Sep 12 2022 18:40:46 GMT+0530 (India Standard Time)
आष्टी(प्रतिनिधी)-मागील सात वर्षांपासून टूर्स अँड ट्रॅव्हलच्या माध्यमातून आरोग्य विभागात राष्ट्रीय बाल स्वास्थ या योजनेत टूर्स अँड ट्रॅव्हलचे हमीपत्र घेऊन सुरू केली आहे.या योजनेत कोविड काळातही गाडी सुरू होती.आपण थकलेल्या बिलाची विचारणा केली असता
अचानकपणे कसलीही पुर्व सूचना न देता वाहन बंद करून माझ्यावर अन्याय केला असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी वाहन चालक बिभिषण मुरलीधर भवर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
सदरील दिलेल्या निवेदनात नमूद आहे की 21 जुलै 2014 पासून सय्यद सिकंदर सय्यद अमर टूर्स अँड ट्रॅव्हलच्या माध्यमातून आष्टी तालुका आरोग्य विभागात राष्ट्रीय बाल स्वास्थ योजनेअंतर्गत टूर्स अँड ट्रॅव्हल्स हमीपत्र घेऊन सुरू केले आहे या योजनेत कोविड काळातही वाहन क्रमांक एम.एच. 23 वाय 2660 ही सुमो गाडी सुरू होती.अचानक पणे कसली पूर्व सूचना न देताना माझे वाहन बंद करून दुसरे वाहन सुरू केले आहे.परिणामी अजून मला संबंधित कंत्राटदाराने माझे बिल दिले नाही.जवळपास 7 लाख 50 हजार रुपये येणे बाकी असूनही माझे वाहन बंद केले आहे.गाडी बंद झाल्याने कुटुंबाची उपासमार होत आहे माझे वाहन बंद केल्यानंतर मी कंत्राटदाराला विचारणा करण्यासाठी गेलो असता ते मला भेटले नाहीत फोनवर विचारणा प्रयत्न केला.परंतु फोन उचलत नसल्याने माझे हाल झाले आहेत.तरी सदरील प्रकरणाची चौकशी करून 15 सप्टेंबर पर्यंत न्याय द्यावा अन्यथा नाईलाजास्तव 26 सप्टेंबर पासून तहसील समोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.या निवेदनाच्या प्रतिनिधी जिल्हा शल्य चिकित्सक बीड, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड जिल्हा पोलिस अधिक्षक साहेब, बीड,तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी,पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहेत.
वाचक क्रमांक :