By : Polticalface Team ,Mon Sep 12 2022 18:55:56 GMT+0530 (India Standard Time)
काही दिवसांपूर्वी नाशिकच्या त्र्यंबकेश्वरजवळील अंबोली फाटा येथे इगतपुरी वनपथकाने बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक केली. तर तपासणी सुरु असताना. यापैकी एकाच्या घरात अंधश्रद्धेतून अघोरी प्रकार समोर आला.
सशयित दत्तू मौळे यांच्या मोखाडा तालुक्यातील चिंचुतारा येथील गावात असलेल्या झोपडीवजा घरात गिधाडाचे पाय व मुंडके लटकवून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. या पराकारणी इगतपुरी वनपथकाने हे सर्व अवयव ताब्यात घेतले आहेत.
संशयित चौघा तस्करांची वनकोठडी आज संपत असून चौघांना आज न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. तसेच बिबट्याच्या कातडीसह जमिनीतून काढलेली बिबट्याची हाडे हे तपासणी करण्यासाठी नागपूरला प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असून प्रयोगशाळेच्या अहवालानंतर महत्त्वाच्या अनेक बाबींचा खुलासा होणार असल्याची माहिती वनरक्षक सहाय्यक वनरक्षक पवार यांनी दिली. वाचक क्रमांक :