श्री गणेशाच्या उत्सवाने आष्टी येथील फार्मसी कॉलेज मंगलमय
By : Polticalface Team ,Mon Sep 12 2022 19:36:51 GMT+0530 (India Standard Time)
आष्टी प्रतिनिधी
आनंद चॅरिटेबल संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मसी आष्टी (डी फार्मसी) व कॉलेज ऑफ फार्मासुटिकल सायन्स अँड रिसर्च आष्टी (बी फार्मसी) तसेच महेश पॅरामेडिकल कॉलेज आष्टी (पीजीडी मएलटी )यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी श्री गणेशाची स्थापना कॉलेजमध्ये करण्यात आली होती. अतिशय मंगलमय वातावरणामध्ये कॉलेजच्या सर्व कर्मचाऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी श्री गणेश उत्सवामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करून श्रीगणेश उत्सव विधिवत साजरा केला. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते विधिवत श्री गणेशाची पूजाआरती केली. त्यामध्ये पहिल्या दिवशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुनील कोल्हे सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी कॉलेजमध्ये अगदी विधिवत श्रीगणेशाची स्थापना करून आरती पूजा केली. दुसऱ्या दिवशी सकाळी बी. फार्मसी कॉलेजचे शिक्षक कर्मचारी व सायंकाळी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हस्ते विधीवत श्री गणेशाची आरती पूजा करण्यात आली. तिसऱ्या दिवशी सकाळी डी. फार्मसी चे शिक्षक कर्मचारी व सायंकाळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. डी बी राऊत सर यांच्या हस्ते विधिवत आरती पूजा करण्यात आली .चौथ्या दिवशी भगवान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी टी वाघ सर व सायंकाळी फार्मसी कॉलेजच्या महिला कर्मचारी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली पाचव्या दिवशी सकाळी डी व बी फार्मसी कॉलेजचे मुलींचे वस्तीगृह मध्ये राहत असलेल्या विद्यार्थिनींच्या हस्ते व सायंकाळी सेवानिवृत्त भारतीय सैनिक श्री मुळे मेजर यांच्या हस्ते आरती पूजा करण्यात आली. सहाव्या दिवशी सकाळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. आ भीमरावजी धोंडे साहेब हस्ते व सायंकाळी कॉलेजचे शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते विधिवत पूजा आरती करण्यात आली .सातव्या दिवशी सकाळी प्र. मोहितेपाटील महाविद्यालय करमाळा येथील प्राचार्य डॉ. देशमुख सर व श्री मोहोळकर सर प्राचार्य अन्नतंत्र महाविद्यालय आष्टी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली तसेच सायंकाळी आष्टी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस साहेब तसेच उपनिरीक्षक श्री देविदास सातव साहेब यांच्या हस्ते विधिवत श्री गणेशाची पूजा करण्यात आली. आठव्या दिवशी महाप्रसाद सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते या दिवशी भाजपा युवा मोर्चा बीड जिल्हा सरचिटणीस युवा नेते डॉ. अजय (दादा)धोंडे यांच्या हस्ते विधिवत श्री गणेशाची महाप्रसाद सत्यनारायण पूजा करण्यात आली तसेच या दिवशी आनंद शैक्षणिक संकुल मधील सर्व कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी जवळजवळ 600 हून अधिक व्यक्तींनी महाप्रसाद स्वरूपात श्री गणेशाचे आशीर्वाद घेतले व सायंकाळी अतिशय धुमधडाक्यात वाजत गाजत श्री गणेशाला निरोप देण्यात आला . या सर्व मंगलमय कार्यक्रमाचे आयोजन डी व बी फार्मसी तसेच महेश पॅरामेडिकल कॉलेज आष्टी येथील सर्व कर्मचाऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी केले होते.
वाचक क्रमांक :