By : Polticalface Team ,Tue Sep 13 2022 14:50:33 GMT+0530 (India Standard Time)
कारला आग लागली, तेव्हा मुख्यमंत्र्यांचा ताफा उड्डाणपुलावरुन रवाना होत होता. कार जळाल्याचे पाहताच मुख्यमंत्री गाडीतून उतरले. त्यांनी कारचालकाची विचारपूस केली आणि धीर दिला. मुख्यमंत्री म्हणाले, कार जवळ जाऊ नका, काळजी घ्या. जीव जास्त महत्त्वाचा आहे. कार दुसरी घेता येईल.
मुंबई विमानतळावर एअरपोर्ट समोर असलेल्या उड्डाणपुलावर फॉर्च्युनर कारने अचानक पेट घेतला. यामुळे हायवेवर एकच खळबळ उडाली होती. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र थोडक्यात मोठा अनर्थ टळला.
दरम्यान कारमध्ये आग लागल्याचं लक्षात आल्यानंतर कारचालकाने गाडी थांबवली आणि तो लगेच खाली उतरला. अगदी काही क्षणांत गाडीने पेट घेतला. भररस्त्यात महागडी कार आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यानं कार चालक हवालदिल झाला होता. यामध्ये कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अखेर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी लगेचच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. यानंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत कार जळून खाक झाली होती वाचक क्रमांक :