By : Polticalface Team ,Tue Sep 13 2022 17:35:35 GMT+0530 (India Standard Time)
यावेळी पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते ममता सरकारविरोधात निदर्शने करत असताना टीएमसीचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. तर काहींनी पोलिसांची गाडी देखील जाळली आहे.
मोर्चा काढणारे विरोधी पक्षनेते तसेच काही खासदारांसह नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना कोलकाता येथील पोलीस मुख्यालयात नेण्यात आले आहे. आंदोलन आटोख्यात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यात. तर पाण्याच्या फवाऱ्यांचा देखील वाफर केला.
याशिवाय भाजप आमदार शिवेंदू अधिकारी यांच्यासह अनेक भाजपच्या मोठ्या नेत्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. टीएमसी कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. तर भाजप कार्यकर्त्यांनी टीएमसी कार्यकर्त्यांवर हल्ला केला असल्याचा आरोप टीएमसीने केला.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील काही महत्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये देखील झटापट सुरू आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या नळकांड्या फोडल्या असून पोलिसांनी परिस्थिती नियत्रंणात आणली आहे. वाचक क्रमांक :