By : Polticalface Team ,Tue Sep 13 2022 17:39:35 GMT+0530 (India Standard Time)
मॉस्कोमधील रुडमिनो फॉरेन लॅंग्वेज स्टडी येथे मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. एका अर्थाने या ठिकाणी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्मारक उभारण्यात आलंय.
अण्णा भाऊंनी आपल्या लिखाणामध्ये रशियाचा देखील उल्लेख करुन स्टालिनग्राडचा पोवाडा, माझा रशियाचा प्रवास आणि अण्णा भाऊंच्या रशियन भाषेत भाषांतरीत झालेल्या कथा कादंबऱ्यांचा समावेश आहे. यामुळे अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य रशियातसुध्दा प्रसिध्द झाले आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री नारायण स्वामी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुध्दे हे असणार आहेत.
दरम्यान, यानिमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे अनुयायी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी 14 आणि 15 सप्टेंबरला मॉस्कोत पोहोचणार आहेत. तसेच इतर अनेक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे वाचक क्रमांक :