चिंचाळा येथिल सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलगा ऋषीकेश पोकळे ने 720 गुणांपैकी 650 गुण घेऊन एमबीबीएस डॉक्टर साठी पात्र
By : Polticalface Team ,Tue Sep 13 2022 20:47:58 GMT+0530 (India Standard Time)
आष्टी प्रतिनिधी
नीट परीक्षेत बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथील ऋषीकेश पांडुरंग पोकळे याने 720 पैकी 650 गुण घेत मोठे यश संपादन केले आहे. ऋषीकेश पोकळे चे वडील सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकरी आहेत.नीट परीक्षेत 650 गुण घेऊन चिचाळ्याचा ऋषीकेश पोकळे हा हा एमबीबीएस डॉक्टर होणार आहे.आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथील ऋषीकेश पोकळे या विद्यार्थी यांने नीट परीक्षांमध्ये भरारी घेत 720 गुणांपैकी 650 गुण घेऊन एमबीबीएससाठी पात्र झाला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या एका मुलाने घवघवीत यश संपादन केल्यामुळे ऋषीकेश पोकळे व त्याच्या कुटुंबीयांचे सर्व चिंचाळा येथील चेअरमन सुनिल पोकळे यांनी सत्कार करुन अकरा हजार रुपये चे बक्षिस दिले. ऋषीकेश हा लहानपणापासूनच खुप होतकरू व जिद्दी होता. वडीलांची परिस्थिती हलाखीची आहे . ऋषीकेशला कुठल्याही सुखसुविधा उपलब्ध नव्हत्या तरी ऋषीकेश ने मोठे यश संपादन करुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आदर्श निर्माण केला आहे. चिंचाळा गावात पहीलाच एमबीबीएस डॉक्टर होण्याचे मोठे यश संपादन केल्या बद्दल चेअरमन सुनिल पोकळे यांनी सत्कार करुन अकरा हजार रुपये चे बक्षिस देऊन पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
वाचक क्रमांक :