By : Polticalface Team ,Tue Sep 13 2022 21:33:20 GMT+0530 (India Standard Time)
1 ऑगस्टला सदरील महिला माहेरी असताना चार लोकांनी तिला बळजबरीने मोटारसायकलवर निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केल्याचं तिने फोनवर सांगितलं. ते लोकं मला जीवे मारतील असंही तिने यावेळी सांगितलं होतं. त्यानंतर तिचा मृतदेह आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सदरील घटनेचा पंचनामा केला. तद्नंनंतर या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तर दुसरीकडे नातेवाईकांनी महिलेचा अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप पोलिसांकडे केला, मात्र सदरील महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांनी नातेवाईकांना सांगितले.
या प्रकरणी पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना आत्महत्येच्या अनुषंगाने विच्छेदन करण्यास सांगितल्याचा आरोपही नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील रेकॉर्डिंग नातेवाईकांकडून सादर करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. पीडित महिलेचे मृत्यूपूर्वीचे झालेले संभाषण, यामध्ये पीडिता आपल्यावर ओढावलेल्या प्रसंगाची अगतिगता सांगितले असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचं सहकार्य मिळालं नसल्याचं नातेवाईकांनी आरोप केला आहे. यावेळी पीडित महिलेवर अत्याचार झाला की नाही? की तिने आत्महत्या केली? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मृत महिलेचा अत्याचाराच्या अनुषंगाने विच्छेदन करुन आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून रणजित ठाकरे, सुनिल वळवी, अमर वळवी या तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेत प्राथमिक तपासातून जे समोर आले आहे, त्यानुसार अतिरिक्त कलमांचा समावेश करण्यात येणार आहे. या प्रकरणी ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर त्यांनी तत्काळ मृतदेहाचे पुन्हा विच्छेदन करण्याच्या सूचना दिल्या आहेत वाचक क्रमांक :