दौंड बहुजन समाज पार्टीच्या वतीने केंद्र व राज्य सरकार विरुद्ध तहसिलदार कार्यालय समोर हल्ला बोल धरणे आंदोलन

By : Polticalface Team ,Wed Sep 14 2022 12:07:17 GMT+0530 (India Standard Time)

दौंड बहुजन समाज पार्टीच्या वतीने केंद्र व राज्य सरकार विरुद्ध तहसिलदार कार्यालय समोर हल्ला बोल धरणे आंदोलन दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता,१४/०९/२०२२, दौंड तालुका बहुजन समाज पार्टीच्या वतीने दि,१२/०९/२०२२, रोजी केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात हल्लाबोल व धरणे आंदोलन करण्यात आले, दौंड बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव अजितजी ठोकळे, पुणे जिल्हा अध्यक्ष रमेशजी गायकवाड, पुणे जिल्हा सचिव रमाकांत कांबळे, पुणे जिल्हा ‌B,V,F, योगेशजी कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड तालुक्यातील बहुजन समाज पार्टीचे पदाधिकाऱ्यांनी व युवा कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी व हल्लाबोल करत,एक दिवसीय धरणे आंदोलन, दौंड तहसीलदार कार्यालय समोर करण्यात आले, यावेळी बहुजन समाज पार्टीच्या वतीने मान्यवर व पदाधिकारी यांचे विविध मागण्यांचे निवेदन दौंड महसुल नायब तहसीलदार मा स्वाती नरुटे यांनी स्वीकारले, दौंड विधानसभेच्या वतीने, राज्यात महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी,अवैध धंदे, बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन, देशातील व राज्यातील अनुसूचित जाती जमाती व मुस्लिम बांधवांवरील वाढत्या अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने,केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन दौंड तहसील कार्यालय समोर करण्यात आले, या आंदोलनात विविध मागण्याही करण्यात आल्या, जीवनावश्यक वस्तूंवरील भरमसाठ जीएसटी,डिझेल पेट्रोल, युवा तरुणांची बेरोजगारी वाढत चालली असल्याने, शेतकऱ्यांची व घरगुती विज बिल माफी, तसेच शेतकऱ्यांच्या ऊसाला एफ आर पी प्रमाणे दर मिळण्याबाबत, दारू मटका जुगार यासारखे अवैद्य धंदे तत्काळ बंद करण्यात यावेत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा,ओबीसी समाजाला राजकीय शैक्षणिक शासकीय नोकरीत आरक्षण कायम करण्यात यावे, मुस्लिम बांधवांना हायकोर्टाने दिलेल्या ५ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी, २५ टक्के आर टी ई, अंतर्गत अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, ज्या शैक्षणिक संस्था शाळेमध्ये जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारत आहेत, आशा शैक्षणिक संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, महार वतनातील शेतजमिनी बेकायदेशीर व्यवहार रद्द करून मूळ मालकांना परत कराव्यात, वरील विविध मागण्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे, या वेळी बहुजन समाज पार्टी प्रमुख उपस्थितीत प्रदेश सचिव मा.अजितजी ठोकळे, पुणे जिल्हा अध्यक्ष मा.रमेशजी गायकवाड, पुणे जिल्हा सचिव मा.उमाकांत कांबळे, पुणे जिल्हा BVF मा.योगेश कांबळे, दौंड विधानसभा अध्यक्ष मा. विशालजी सोनवणे, दौंड विधानसभेचे इतर पदाधिकारी कोषाध्यक्ष - मा. अमनभाई शेख, महासचिव - गोरख ननवरे, उपाध्यक्ष - तुषार सवाने, अभिजित डेंगळे, सुनिल शिंदे, हर्षल पाटोळे, अनिल थोरात, बबन थोरात, वाहिद सय्यद, शिवशरण संगेपान, बाळू विजेगत, सुरेश झेंडे, राहुल चलवादी, सचिन काकडे, राहुल कंकाळे, जावेदभाई शेख, तुषार सवाने, मनोहर कोकरे, ऍड. अनिल कांबळे, ऍड. आर. बी. शिंदे, ऍड. शशिकांत गायकवाड आदी बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.