By : Polticalface Team ,Wed Sep 14 2022 14:36:44 GMT+0530 (India Standard Time)
मांडवा येथील रहिवासी असलेले संजय विक्रम चाटे हे मे 2001 मध्ये केंद्रीय रिझर्व पोलीस बलामध्ये दाखल झाले होते. भारतीय सैन्यात दाखल होताच सुरुवातीच्या काळामध्ये पुणे सेंटर मध्ये त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर अकरा वर्ष जम्मू आणि काश्मीर, तसेच तीन वर्ष बिहार, चार वर्षे छत्तीसगड आणि साडेतीन वर्ष दिल्ली असे ठिकाणी त्यांनी काम केले. संजय चाटे यांचे प्राथमिक शिक्षण मांडवा या गावी झाले. त्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण शहरातील मिलिंद महाविद्यालयात तर इयत्ता अकरावी वैजनाथ महाविद्यालयात केल्यानंतर पुढील बीएपर्यंत शिक्षण नवगण महाविद्यालयात पूर्ण केले. यादरम्यान भारतीय सैन्यामध्ये भरती निघाली असता त्यांनी देश सेवा करण्याचे पसंत केले आणि सैन्य दलात भरती झाले.
त्यांना सैन्याचा हा वारसा त्यांचे चुलते दशरथ चाटे यांच्याकडून मिळाला. त्यांचे चुलते दशरथ चाटे हे भारतीय सैन्यामध्ये मेजर सुभेदार या पदावर कार्यरत होते. त्यांच्यामुळे लहानपणापासून त्यांना आपणही सैन्यामध्ये आपल्या चुलत्याप्रमाणे जाऊन सेवा करावी असे मनोमन वाटत होते. त्यांची घरची घरची परिस्थिती तशी सामान्यच होती. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या संजय चाटे यांना एक भाऊ, आणि एक बहीण आहे.
ते नुकतेच 31 ऑगस्ट रोजी भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाले. यानंतर त्यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर संतोष मुंडे यांनी श्रीनाथ हॉस्पिटलमध्ये सत्कार केला. याप्रसंगी एडवोकेट प्रकाश मुंडे, विठ्ठल साखरे, विजय शिंदे, पत्रकार महादेव गीते आदी उपस्थित होते. 21 वर्षापेक्षा जास्त सेवा काळामध्ये त्यांना सर्वात आव्हानात्मक सेवा कुठे वाटली असे विचारले असता; त्यांनी जम्मू-काश्मीर आणि छत्तीसगड मधील नक्षलवादी एरिया हा सर्व सैन्य तसेच पोलीस दलासाठी धोकादायक आहे असे सांगितले. परंतु न घाबरता जवान तिथे काम करतात त्याचा अभिमान असल्याचे म्हणाले. प्रत्येक घरातील एक तरी सदस्य देश सेवा करण्यासाठी सैन्यात जायलाच पाहिजे अशीही भावना त्यांनी व्यक्त केली. वाचक क्रमांक :